सातारा 

​सहकारमंत्र्यांची हरणाई सहकारी सूतगिरणीस सदिच्छा भेट…

सातारा (अभयकुमार देशमुख) :
राज्याचे सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील येळीव ता खटाव येथील हरणाई सहकारी सूतगिरणीस ​आज ​सदिच्छा भेट दिली. यावेळी बाळासाहेब पाटील यांचे हरणाई सुतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष तसेच राष्ट्रीय कॉग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी स्वागत केले.

सुतगिरणीचे नियोजणबद्द कामकाज पाहून बाळासाहेब पाटील यांनी समाधान व्यक्त केले. संपूर्ण सुतगिरणीची पाहणी केल्यानंतर सहकार क्षेत्रात हरणाई सुतगिरणी आपल्या कामाच्या जोरावर अग्रेसर ठरत असल्याचे कौतुकही त्यांनी केले.​ ​राष्ट्रीय कॉंग्रेसचे आणि हरणाई सुतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या सदिच्छा भेटीबद्दल आभार मानले.​ ​यावेळे सुतगिर​​णीतील कामगार वर्गही उपस्थित होते.

satara

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: