गोवा 

प्रा. गोपाळराव मयेकरांना दिगंबर कामतांची आदरांजली

पणजी :
गोव्याचे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी आज माजी खासदार, माजी मंत्री, विचारवंत, लेखक, शिक्षणतज्ञ प्रा. गोपाळराव मयेकर यांच्या म्हापसा येथिल “रवि बिंब” निवासस्थानी भेट देवून त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन केले व स्व. मयेकारांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी कला अकादमीचे माजी कार्यक्रम अधिकारी गोविंद काळे उपस्थित होते.

प्रा. गोपाळराव मयेकरांच्या अंत्यसंस्काराला दिल्लीत असल्यामुळे आपण उपस्थित राहू शकलो नाही याबद्दल दिगंबर कामत यांनी मयेकर कुटूंबियांकडे दिलगीरी व्यक्त केली.

प्रा. गोपाळराव मयेकरांचे गोव्यातील शिक्षण, साहित्य, समाजसेवा अशा अनेक क्षेत्रात मोलाचे योगदान होते. आपण एका महान गोमंतकीय सुपुत्रास मुकलो आहोत अशा शब्दात दिगंबर कामत यांनी आदरांजली वाहिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: