सातारा 

‘आरक्षण, पद्दोन्नती बाबत सरकारने मार्ग काढावा’

सातारा (अभयकुमार देशमुख) :
मराठा आरक्षण, ओबीसीची राजकीय आरक्षणांचा मुद्दा आणि पद्दोन्नतीचा प्रश्न आहे. राज्य सरकाराच्या बाबतीत हे तीन प्रश्न गांभीर्याने पुढे आलेले आहेत. एका बाजूला कोरोनाचे संकट, लाॅकडाऊन, बेड मिळत नाही, लसीकरणांचा मुद्दा आहे, आॅक्सिजन मिळत नाही, अर्थिक मंदी, ब्लॅंक फंगस आहे. तेव्हा राज्य सरकारमधील प्रमुखांनी बसून मार्ग काढला पाहिजे. अन्यथा समाजा- समाजमधील तेढ निर्माण होवू शकतो, असा इशारा भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.मराठा आरक्षणांच्या संदर्भात सातारा जिल्ह्यात दोन दिवसांच्या दाैऱ्यावर हर्षवर्धन पाटील आलेले होते. आज त्यांनी काॅंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी जवळपास दीड तास चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले, सर्वच राजकीय पक्षांचे जे प्रमुख आहेत, त्यांना आम्ही भेटत आहोत. सुप्रीम कोर्टाकडून रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळाव, यात कायदेशीर, घटनात्मक बाबींचा विचार करून हा प्रयत्न चालू आहे.

आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार, केंद्र सरकार, सगळे पक्ष मराठा आरक्षणाच्या बाजूने असताना राज्य सरकार कुठे कमी पडले, काही त्रुटी राहिल्या आहेत का यांचा विचार करत आहोत. भारतीय जनता पक्ष म्हणून जे जे आंदोलन करतील, त्यांच्या सोबत राहू, त्यांना आमचा पाठिंबा असेल असेही पाटील म्हणाले

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: