गोवा 

‘सरकारने द्यावी शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई’

मगोपचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी केली मागणी 

पेडणे (प्रतिनिधी) :
शेतकरी हा देशाचा कणा आहे,  शेतकरी जगाला तरच देश आणि आम्ही जगणार यासाठी शेतकऱ्यांच्या  मेहनतीची सरकारने  गंभीर दखल घेत ज्या शेतकऱ्यांचे चक्रीवादळात नुकसान झाले त्यांना लवकरात लवकर आर्थिक  मदत करावी असे आवाहन मगो नेते प्रवीण आर्लेकर यांनी इब्रामपूर येथे चक्रीवादळात नुकसान झालेल्या केळी बागायतीची पाहणी केल्यानंतर  केले.

समाज कार्यकर्ते तथा मगोचे नेते प्रवीण आर्लेकर म्हणाले जनतेची सेवा करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. पेडणे विधानसभा मतदारसंघातील गरजू  लोकांना मदत करताना समाधान मिळते. कर्तव्य भावनेने केलेली मदत लोक कधीही विसरत नाही. या  शेतकऱ्यांकडे सरकार का दुर्लक्ष करत आहे.पेडणे येथील शेतकऱ्यांचा आणि खास करून इब्रामपूर या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात  चक्री वादळाने नुकसान झाले. यापूर्वी या भागातील शेतकऱ्यांचं मागे दोन-तीन वर्षांपूर्वी असच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ,  मात्र सरकार आणि स्थानिक आमदार याचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असून,  सरकार असे का करतो असा प्रश्न प्रवीण आर्लेकर यांनी उपस्थित करत या शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष देऊन जे काही त्यांची नुकसानी झाली त्यांना मदत आर्थिक मदत करावी, असे आवाहन केले.

तौक्ते  चक्रीवादळात इब्रामपूर येथील झालेल्या शेतकऱ्यांच्या केळी बागयतीचे मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले.   नुकसान झालेल्या केळी बागायतीची पाहणी मगो नेते प्रवीण आर्लेकर यांनी पाहणी करुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत देण्यार असल्याचे जाहिर केले.यावेळी  मगो प्रवक्ते   उमेश तळवणेकर , उगवे-  तांबोसे – मोप-  पंचायतीचे  उपसपंच   सुबोध महाले , वजरीचे माजी सरपंच संजय देवीदास, इब्रामपूरचे पंच  शेखर खडपकर, अभिजीत शेट्ये आदी उपस्थित होते.

आपण या भागाचे पाहणी केली मात्र या भागाचे आमदार असलेले आजगावकर यांनी अजूनही या भागात इब्रामपूर येथे आले नाही. त्यांना याबाबत काही पडलेलं नाही. या भागात शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून शेती बागायती लागवड केली आणि या चक्रीवादळाने आपत्तीने या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची दखल स्थानिक आमदाराने घ्यायला पाहिजे होती मात्र ती त्यांनी घेतली नाही. आपण माणुसकीच्या नात्याने आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना आपल्याकडून काय हातभार लागेल यासाठी आपण त्यांची या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या परीने शक्य होईल तेवढी मदत करण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आर्लेकर यांनी इब्रामपूर येथे केले.

यावेळी बोलताना माजी पंचायत सदस्य तथा शेतकरी अशोक धावसकर म्हणाले की, शेतकऱ्यांचं नुकसान दरवर्षी आमच्या भागात होते त्यावेळेस सरकार मात्र आमच्याकडे लक्ष देत नाही. गेले दोन तीन वर्षाची नुकसान भरपाई सरकारने आमची द्यायची आहे. आता ही सरकारने या भागात पाहणी न करता आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे. माझ्या  सुमारे दीड हजार केळी मोडून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  यापूर्वी आम्ही कृषिमंत्री बाबू कवळेकर यांची भेट घेऊन त्यांना याविषयी सविस्तर माहिती देऊन या संबंधित वेगळे  योजन   करा अशी विनंती केली होती. मात्र याबाबत अजूनही शेतकी खात्याकडून तसा कोणताही प्रकारचा प्रस्ताव किंवा तशी कोणतीही योजना सरकारने जाहीर न केल्याने आता शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न पडलेला आहे.

यावेळी बोलताना युवा शेतकरी मुन्ना धावसकर म्हणाले की, या भागाचे आमदार यांनी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन या भागाची पाहणी करायला पाहिजे होती. मात्र ते अजून पर्यंत ह्या भागात आले नाही त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना कुणी वाली नव्हता मात्र म.गो. नेते प्रवीण आर्लेकर यांनी आम्हाला एक आधार देत आमच्या शेतकऱ्यांची नुकसानभरपाई काय झाली असा प्रश्न विचारून आम्हाला समाधान देण्याचा प्रयत्न केला आहे.

यावेळी उमेश तळवणेकर यांनी स्थानिक आमदार काही कामाचे नसल्याचे सांगून या शेतकऱ्यांची अजून पर्यंत त्यांनी दखल घेतली नाही. त्याने ज्या भागात येऊन पाहणी करायला पाहिजे होते मात्र ते अजून पर्यंत या भागात आले नसल्याबद्दल त्यांचा आपण निषेध करतो असे ते म्हणाले. यावेळी नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची विचारपूस करत त्यांच्या नुकसान झालेल्या केळी बागायतीची पाहणी  या वेळी करण्यात आली.

यावेळी बोलताना इब्रामपूरचे पंच सदस्य चंद्रशेखर खडपकर म्हणाले की, या भागाचे आमदार यांनी या शेतकऱ्यांची विचारपूस करणे गरजेचे होते मात्र त्यांना आपल्या कुठल्याही प्रकारची त्यांनी विचारपूस केली नसून या भागात अजून पर्यंत आले नाही. मात्र आमचे नेते यांनी पेडणे मतदारसंघातील इब्रामपूर अधिक भागात त्यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. तसेच आपल्या परीने शक्य होईल ती मदत शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला याबद्दल त्यांनी आर्लेकर यांना धन्यवाद देत त्याने असेच कार्य करावे,असे सांगितले.

यावेळी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या  केळी बागायती शेतकरी   दत्ताराम भरभरे  ,  प्रज्योत गवस, अनिकेत पेडणेकर, मडसो नाईक , रुपेश सावंत , दिलीप राणे, दत्ताञय  नाईक, दिनेश हळर्णकर लवू हळर्णकर, मुन्ना धावस्कर , राहुल इब्रामपूर,  शिवम हळर्णकर,सदानंद नाईक, शिवा हळर्णकर, गंगाधर गवस, अशोक धावस्कर, साबी सागर गवस, महेश्वर गवस. सदानंद नाईक , संतोष झोरे , शांताराम शिरोडकर आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: