गोवा 

बालकांच्या लसीकरणाबाबत राज्याचे नवे पाऊल

पणजी :
गुरुवारपासून विशेष गटासाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर आता डॉ प्रमोद सावंत सरकारने आणखी एक दिलासादायक निर्णय घेतला. या निर्णयामुळे आता ५ वर्ष वय असलेल्या पाल्याच्या आईवडिलांना कोरोना लसीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

सीएमओ गोवा या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन या नव्या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनीही हे ट्वीट शेअर करुन या निर्णयाची माहिती दिली आहे. यात स्पष्टपणे असं नमूद करण्यात आलं आहे, की उद्यापासून (गुरुवारपासून) २ वर्ष वय असलेल्या पाल्यांच्या पालकांनाच लसीकरणाल प्राधान्य देण्यासोबत आता या वयोगटात वाढ करुन ५ वर्ष वय असलेल्या पाल्यांच्या पालकांनाही लसीकरणार प्राधान्य दिलं जाणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लहानग्यांना सर्वाधिक असल्याची चिंता व्यक्त केली जातेय. अशा पार्श्वभूमीवर लहान मुलांना त्यांच्या पालकांमुळेच संसर्ग होण्याची शक्यता जास्त असणार आहे. त्यामुळे आधीच स्तनदा मातांचं लसीकरण करण्याला प्राधान्य देण्यात आलं होतं.

दरम्यान, आता या निर्णयाला आणखी व्यापक रुप देत, डॉ. प्रमोद सावंत सरकारनं लसीकरणाचं लक्ष्य गाठण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालकांच्या लसीकरणाचं मुलांच्या वयाच वाढ केल्यामुळे आता अनेकजण लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. विशेष म्हणजे या लसीकरणासाठी नोंदणीची आवश्यकता नसून, थेट आपल्या मुलाचा जन्मदाखला आणि जो लस घेणार आहे, त्याचं आधारकार्ड सोबत देणं बंधनकारक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरणाच्या मोहिमेला वेग येईल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: