गोवा 

‘राज्याच्या आरोग्य यंत्रणेत आता राज्यपालांनी हस्तक्षेप करावा’

आम आदमी पक्षाच्या राहुल म्हांबरे यांनी केली मागणी

पणजी :
एकीकडे गोयंकर दररोज मृत्यूशी सामना करत असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे दोघे आपापल्या राजकीय भांडणात गुंतले आहेत. आणि त्यांचे हे भांडण सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणारे असल्याची टिप्पणी आम आदमी पक्षाचे राहुल म्हांबरे यांनी केली आहे.  जीएमसी येथील नोडल अधिकाऱ्याने आज उच्च न्यायालयात राज्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्याचे अधिकृतपणे मान्य केले असल्याचे निदर्शनास आणून देत,  म्हांबरे यांनी सांगितले की, “ऑक्सिजन संकटावर ‘आप’ने सतत SOS संदर्भात दिलेल्या सतर्कतेकडे लक्ष दिले गेले असते तर आज शेकडो मौल्यवान गोयंकरांचे जीव वाचू शकले असते. डॉ.  प्रमोद सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर आता लोकांचा विश्वास राहिला नसून, नागरिकांचा सरकारी रुग्णालयांवर विश्वास वाढण्यासाठी आता सर्व प्रकरणात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

म्हांबरे म्हणाले की,”आरोग्यमंत्र्यांनी स्वतःच्याच विभागाच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी हायकोर्टाची चौकशी समितीची केलेली मागणी तसेच आंतोनियो मोन्सेरात यांची अनपेक्षित विधाने आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी, हा सर्व प्रकार म्हणजे भारतीय जनता पक्षाचे राजकीय तियात्र आहे, जे सादर करून त्यात ते आपल्या स्वतःच्या राजकीय अपयश जनतेपासून लपवू पाहत आहेत.

जर आरोग्यमंत्री राणे यांना हायकोर्टाने दिलेल्या सर्व गंभीर धोक्यांची कल्पना होती तर मग  जेव्हा शेकडो लोकं मरत होती, तेव्हा त्यांनी मौन का बाळगले? तसेच वाढत्या कोरोनाबद्दल आंतोनियो मोन्सेरात यांना अचानक कशी काय काळजी वाटायला लागली? असा प्रश्नही म्हांबरे यांनी उपस्थित करत, जेव्हा त्याच्यांच स्वत:च्या मतदारसंघात सुपर-स्प्रेडर कॅसिनो सुरु होता तेव्हा मात्र ते मूग गिळून गप्प होते, असेही म्हांबरे यांनी यावेळी नमूद केले.

विश्वजित राणे, प्रमोद सावंत

काल कोविड वॉर्डांच्या दौऱ्यावर असताना, मुख्यमंत्री सावंत आरोग्यमंत्र्यांना सोबत घेऊन येण्याऐवजी फोटोग्राफरच्या टीम घेऊन आले होते, असे म्हणत प्रमोद सावंत यांची म्हांबरे यांची खिल्ली उडवत, मुख्यमंत्र्यांनी या भेटीचा वापर केवळ चमकोगिरी करण्यासाठी केला, त्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यात रस नाही असा आरोप यावेळी म्हांबरे यांनी केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: