गोवा देश-विदेश

‘कोविड चाचणी व लसीकरणावर सरकारने करावा कृती आराखडा’

मडगाव :
लसीकरणाच्या राष्ट्रीय तांत्रीक सल्लागार मंडळाने ज्या रुग्णांना सार्स कोविड-२ रोगाची लागण झालेली आहे त्यांनी रोगातुन पुर्ण बरे झाल्याच्या दिवसापासुन सहा महिन्यानंतर कोविड लस घ्यावी अशी शिफारस केली आहे. यामुळे आता कोविडची लस घेण्याअगोदर कोविड चाचणी करुन घेणे गरजेचे ठरणार आहे. आरोग्य मंत्रालयाने यावर त्वरित खुलासा करावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने कोविड चाचणी व लसीकरण यावर एक कृती आराखडा तयार करणे गरजेचे आहे. आज सरकारकडुनच वेगवेगळी व परस्पर विरोधी माहिती बाहेर निघत असल्याने लोकांच्या मनात अविश्वासाची भावना तयार झाली आहे. लसीकरण व चाचणी या बद्दल सरकारच्याच गोंधळामुळे लोकांच्या मनात एक प्रकारचा भय निर्माण झाला आहे. सरकारने ताबडतोब साध्या व सुटसुटीत भाषेत यावर स्पष्टीकरण द्यावे व लोकांच्या मनातील गैरसमज दूर करावे, अशी मागणी कामत यांनी यावेळी केली.

सदर सल्लागार मंडळाने कोविशील्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोस मध्ये १२ ते १६ आठवड्यांचे अंतर ठेवावे असे म्हटले आहे. आता ४ ते ८ आठवड्याच्या अंतराने सदर लसीचा दुसरा डोस दिला जातो असे दिगंबर कामत यांनी सांगीतले.

गरोदर महिलांना त्यांच्या इच्छेनुसार हवी ती लस घेता येते व मुलांना दुध पाजणाऱ्या महिलांनाही कधिही लस घेण्याची मुभा असेल असे एनटीएजीआयने म्हटले आहे.

लसीकरणाच्या राष्ट्रीय तांत्रीक मंडळाच्या शिफारशी आता लसीकरणाच्या राष्ट्रीय तज्ञ  मंडळाकडे जाणार असल्या तरी सरकारने यावर त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत आता वेळ घालवुन चालणार नाही असे दिगंबर कामत म्हणाले.

digambar kamat
दिगंबर कामत

एनटीएजीआयच्या शिफारसी प्रमाणे सरकारला आता कोविड चाचणी केंद्रे वाढवावी लागणार असुन, अधिक चाचण्यांवर भर द्यावा लागणार आहे. कोविड चाचणी केल्यानंतरच कोविड लस घ्यायची की सहा महिने वाट पहायची हे स्पष्ट होणार आहे. सरकारने आता कोविड आजारातुन बरे व्हायला नक्की किती काळ लागतो हे स्पष्ट करणे गरजेचे आहे असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.

भाजप सरकारने कृती दलाची स्थापना करुन कोविड व्यवस्थापन त्यांच्याकडे द्यावे अशी मी परत एकदा मागणी करतो. तज्ञांकडुनच कोविड चाचणी व लसीकरणावर देखरेख ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक पंचायत व नगरपालीका पातळीवर चाचणी केंद्रे व लसीकरण केंद्रे उभारली तर जिल्हा इस्पितळे व गोमेकॉवरचा त्राण कमी होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: