क्रीडा-अर्थमत

महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन

पुणे :
देशाला बॅडमिंटनमधील पहिले विजेतेपद मिळवून देणारे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर (वय ८८) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध टेनिसपटू गौरव नाटेकर हा त्यांचा मुलगा आहे.

नाटकेर यांच्या निधनाने बॅडमिंटन क्षेत्राची आणि क्रीडा विश्वाची हानी झाली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध खेळाडू आणि क्रीडा संघटनांनी श्रद्धांजली अर्पण के ली आहे.

nandu-natekarसांगली हे नंदकुमार ऊर्फ नंदू नाटेकर यांचे जन्मगाव. १९३३मध्ये त्यांचा जन्म झाला. सुरुवातीला नाटेकर टेनिस खेळायचे. परंतु कनिष्ठ राष्ट्रीय स्पध्रेत महान टेनिसपटू रामनाथन कृष्णन यांच्याकडून पराभवानंतर त्यांनी टेनिसला रामराम ठोकून बॅडमिंटनमधील कारकीर्दीकडे मोर्चा वळवला. मग बॅडमिंटनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी देशाचे नाव सदैव चमकत ठेवले. १९५४मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत त्यांनी उपांत्यपूर्व फे री गाठली होती. १९५६मध्ये मलेशियातील सेलंगर स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय होण्याचा मान नाटेकर यांना मिळाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेतेपद पटकावणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले. १९६१मध्ये अमृतसर येथील राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी तिहेरी मुकुट मिळवला होता. सहा वेळा राष्ट्रीय पुरुष एकेरी स्पर्धेचे विजतेपद त्यांनी मिळविले. तसेच पाच वेळा मिश्र दुहेरीचे विजेतपद त्यांनी मिळवले. पुरुषांच्या थॉमस चषक स्पर्धेत १६ पैकी १२ एके री सामने त्यांनी जिंकले होते. थायलंड येथील खुल्या एके री बॅडमिंटन स्पर्धेतही त्यांनी विजय संपादन के ला होता. आपल्या क्रीडा कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शंभर वेळा विजेतपद मिळवले होते. जमैका येथे १९६५मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. १९८०-८१मध्ये त्यांनी ज्येष्ठांच्या दुहेरी स्पर्धामध्येही भाग घेतला. याशिवाय गोल्फसुद्धा ते खेळायचे.

नाटेकर यांच्या शैलीमुळे १९५०-६०च्या शतकात देशात सर्वदूर बॅडमिंटन हा खेळ घरोघरी पोहोचला. त्याचे श्रेय नाटेकर यांना जाते. खेळातील प्राविण्यामुळे देशात क्रीडा संस्कृती रुजण्यास सुरुवात झाली. बॅडमिंटनबरोबरच अन्य खेळांचेही आकर्षण वाढून राष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडू घडले. उदयोन्मुख खेळाडू घडविण्यातही त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना १९६१मध्ये पहिल्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने भारतीय बॅडमिंटन क्षेत्रातील एक पर्व संपले आहे. नाटेकर यांच्या पार्थिवावर औंध येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी ट्विटद्वारे नंदू नाटेकर यांच्या पहिल्या सामन्याची आठवण काढत, त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: