क्रीडा-अर्थमत

मिल्खा सिंग यांचे करोनामुळे निधन

नवी दिल्ली :
भारताचे माजी महान धावपटू मिल्खा सिंग यांची प्राणज्योत शुक्रवारी रात्र साडे अकराच्या सुमारास मालवली. मिल्खा सिंग यांना करोनाची बाधा झाली होती. ते 91 वर्षांचे होते.

गेले महिनाभर ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते.  त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे गेल्या काही दिवसांत हॉस्पिटलकडून सांगण्यात आले होते. पण आज अखेर मिल्खा सिंग यांचे निधन झाल्याची बातमी पीटीआयने दिली आहे.  अवघ्या पाच दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचेही करोनामुळे निधन झाले होते.

मिल्खा सिंग यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंदेश ट्विटरवर नोंदवला आहे.

मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. १९५८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २०० आणि  ४०० मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून ४६.६ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर २०० मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही धाव केवळ २१.६सेकंदात पूर्ण केली. १९६२मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. १९५९मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: