google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘राज्य सरकारची ‘हर घर मल’ योजना!’

मडगाव :

सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल हे “हर घर जल’ देण्यास सपशेल अपयशी ठरल्यानंतर आता “हर घर मल’ची योजना राबवीत आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.


सांकवाळ येथील रहिवाशांनी सांडपाणी वाहून नेणारा पाण्याचा टँकर पकडल्याच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत काँग्रेस अध्यक्षांनी भाजप सरकारकडून कोणतीही आशा नसल्यामुळे लोकांनीच आता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


सांडपाण्याने भरलेला पाण्याचा टँकर रंगेहाथ पकडणाऱ्या सांकवाळ येथील रहिवाशांचे मी अभिनंदन करतो. भाजप सरकार गोव्यातील सांडपाणी माफियांना प्रोत्साहन देत आहे, असे अमित पाटकर म्हणाले.


गोव्यात कोणत्याही गोष्टीवर सरकारचे नियंत्रण राहिलेले नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी आपली अकार्यक्षमता उघडपणे मान्य केली आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे कर्नाटकात कन्नड बोलण्यात व्यस्त आहेत. गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने गोव्यात माफीयांना रान मोकळे झाले आहे, असे अमित पाटकर म्हणाले.


केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने गोव्याला 100 टक्के ‘ओपन डेफिकेशन फ्री’ आणि 100 टक्के “नळाची जोडणी असलेले राज्य घोषित करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. वास्तव हे आहे की सरकारचे दोन्ही दावे जुमला असल्याचे सिद्ध झाले आहे असे अमित पाटकर म्हणाले.



भाजप सरकार आता “हर घर मल” (मानवी मलमूत्र) पुरवण्याच्या मोहिमेवर आहे. गोव्यातील जनतेने आता निर्धाराने हे अहंकारी भाजप सरकार पाडण्याची गरज आहे, असे अमित पाटकर म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!