गोवा 

पहाटे २ ते ६ दरम्यानच कसे होतात कोविड रुग्णांचे मृत्यू?

आरोग्यमंत्री राणे यांनी केली न्यायालयीन चौकशीची मागणी

पणजीः
जीएमसीत ऑक्सिजन पुरवठा कमी होतो की नियोजनाची कमी आहे हे उच्च न्यायालयाकडून समिती स्थापन करून तपासण्यात यावे. ऑक्सिजन पुरवठ्याचं नियोजन उच्च न्यायालयाने आपल्या ताब्यात घ्यावे. न्यायालयाने ऑक्सिजन पुरवठ्याबाबत श्वेतपत्रिका काढावी व सूचना कराव्यात, अशी मागणी आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी केली. गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये (जीएमसी) पहाटे 2 ते 6 दरम्यान कोविड-19 रुग्णांचा अचानक मृत्यू का होतो, याची चौकशी करण्याची मागणीही आरोग्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयाकडे केली.

जीएमसीत पहाटे दोन ते सहा या दरम्यान होणारे मृत्यू ही ‘वस्तुस्थिती’ आहे. त्यामागील कारणांची उच्च न्यायालयाने चौकशी करावी, असं राणे म्हणाले. मंगळवारी पहाटे 2 ते 6 या वेळेत जीएमसीमध्ये जवळपास 26 कोविडबाधितांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या जीएमसी भेटीनंतर आरोग्यमंत्र्यांनी प्रशासकीय समस्यांमुळे रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता असल्याचं कबूल केलं.

Gard
विश्वजीत राणें

रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी वॉर्डप्रमाणे यंत्रणा उभारणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. मात्र जीएमसीत तसं काही झालेलं नाही. उलट एक ऑक्सिजन सिलिंडर दोन कोविड रुग्णांमध्ये वाटून दिला जातोय. जीएमसीतील ऑक्सिजनच्या अल्पपुरवठ्याची कबुली देताना आरोग्यमंत्री म्हणाले, सोमवारी जीएमसीमध्ये 1,200 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर्सची गरज होती, पैकी केवळ 400 सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला, परिणामी ऑक्सिजनचा तुटवडा भासला. तसंच ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने तो कसा भरून काढता येईल यावर चर्चा करण्याची गरज असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

जीएमसीतील कोविड-19 उपचारांवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या नोडल अधिकाऱ्यांच्या त्रिसदस्यीय पथकानेही मुख्यमंत्र्यांना या मुद्द्यांबाबत माहिती द्यावी, असंही आरोग्यमंत्र्यांनी सुचवले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: