गोवा 

​’​आरोग्य सचिवांनी ​द्यावी ​रुग्णांना खाटा, उपकरणे व जीवाची सुरक्षा देण्याची हमी’​

पणजी ​:
आज गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात रुग्णांना खाटा, उपचारासाठी लागणारी उपकरणे मिळणार की नाहीत याबद्दल लोकांच्या मनात शंका व भय आहे. सुपरस्पेशलीटी ब्लॉकच्या एका वार्डचे छप्पर कोसळल्यानंतर व वार्डात पाणी घुसल्यानंतर सदर इमारतच खाली येणार नाही ना असा भय लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. आरोग्य सचिव रवी धवन यांनी लोकांना खाटा, उपकरणे व जीव राखण्याची सुरक्षा देण्याची हमी द्यावी व मगच पत्रकार व विरोधकांना दोष द्यावा असे कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते तुलीयो डिसोजा यांनी म्हटले आहे.

गोमेकॉतील गलथान कारभार व कोविड हाताळणीत सरकारला आलेले अपयश यावर सारवासारव करुन सरकारची कातडी वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोग्य सचिवांचा आम्ही निषेध करतो. गोमेकॉत पहाटे २ ते ६ या वेळेत ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यु होतात हे खुद्द आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी  मान्य करुन त्यावर जाहिर वक्तव्य केले होते. आता आरोग्य सचिवांनी इतरांना दोष न देता सत्याला सामोरे जावे व आरोग्यमंत्र्यांकडुन निट माहिती करुन घ्यावी. गोमेकॉतील पहाटेचे मृत्यु हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे न झाल्याचे सांगुन एक प्रकारे आरोग्य सचिवांनी उच्च न्यायालयात सरकारनेच मान्य केलेल्या माहितीच्या अगदी विरोधात भुमिका घेतली आहे असे तुलीयो डिसोजा यांनी म्हटले आहे.

गोमेकॉत तसेच इतर इस्पितळांत जर वेळेवर खाटा, उपचारासाठी लागणारी उपकरणे व यंत्रणा, औषधे उपलब्ध असणार याची पुर्ण हमी सरकारने द्यावी तसेच रुग्णांना खुर्ची, स्ट्रेचर व जमीनीवर झोपवुन उपचार देणार नाही याची खात्री आरोग्य सचिव रवी धवन यांनी दिल्यास कॉंग्रेस पक्ष लोकांना इस्पितळात दाखल करुन घेण्यासाठी खास अभियान सुरू करण्यास तयार असल्याचे तुलीयो डिसोजा यांनी सांगीतले. आज भाजप सरकारच्या नाकर्तेपणाने संपुर्ण आरोग्यसेवा यंत्रणा कोसळली असुन सरकार मात्र इतरांकडे बोट दाखवुन आपल्या कर्मांचे खापर दुसऱ्यांच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करीत आहे.

कोविड सेंटर असलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या दर्शनी काचा कोसळल्या त्यावर सरकारने काय कारवाई केली?, दोन दिवस अगोदर कार्यांवित केलेल्या गोमेकॉतील सुपर स्पेशलिटी ब्लॉकच्या वार्डाचे छप्पर कोसळले व आत पाणी शिरले त्याला कोण जबाबदार आहे यावर आरोग्य सचिवांनी भाष्य करावे. आज भाजप सरकारच्या भ्रष्ट कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली असुन, मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे धाडस नसल्यानेच आता सरकारी अधिकाऱ्यांना त्यानी पुढे केले आहे असे तुलीयो डिसोजा म्हणाले.

गोवा वैद्यकिय महाविद्यालय इस्पितळातील कोविड वार्डातील अना​गोंदी  कारभाराचे दर्शन घडविणाऱ्या अनेक चित्रफीती आज समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तडफडणारे कोविड रुग्ण संपुर्ण गोव्याने पाहिले आहेत. गोमेकॉतीस स्वच्छता गृहांची दारुण अवस्था व सगळीकडे पसरलेले घाणीचे साम्राज्य लोकांनी बघितले आहे. आता सरकारची बाजू घेवुन इतरांना दोष देणाऱ्या आरोग्य सचिवांनी हे सगळे खोटे आहे का ते सांगावे अशी मागणी तुलीयो डिसोजा यांनी केली आहे.

सरकारने आता वेळ न घालवता कोविड व्यवस्थापनासाठी कृती दलाची स्थापना करावी. सरकार आज रुग्णांना चांगले उपचार देण्यास अपयशी ठरलेच आहे त्याबरोबर मृतांवर वेळेत अंत्यसंस्कार करु देण्यासही आडकाठी आणीत आहे.

गोवा वैद्यकिय महाविद्यालय इस्पितळात मृतदेहांच्या हाताळणीत लुटमार सुरू असुन, वार्डातुन शवागारात व शवागारातुन हर्स व्हॅनीत मृतदेह हलविण्यासाठी लोकांकडुन पैसै लुटले जात आहेत. परंतु, सरकारचे यावर लक्ष नसुन, आरोग्य सचिवांनी यावर लक्ष देणे गरजेचे ​असल्याचेही डिसोझा यांनी सांगितले. ​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: