मुंबई 

​’​केंद्राच्या सागरमाला योजनेतून ​मच्छीमारां​ना मदत द्या’

​​पालघर​ (अभयकुमार देशमुख) :​
तौक्ते चक्रीवादळाने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत अशा संकटात राज्य शासनाकडून विशेष मदत मिळत नाही. मात्र केंद्र सरकारच्या योजना आमच्यापर्यंत पोहचत नाही, त्यामुळे आम्हाला केंद्राच्या सागरमाला योजनेतून मदत मिळवून द्या, असे साकडे मच्छीमारांनी आमदार अँड आशिष शेलार यांना घातले.

पालघर दौऱ्यात आज भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार आणि आमदार मनिषा चौधरी यांनी पालघर मधील माहिम टेंभी या गावाला भेटी देऊन नुकसान झालेल्या बोटींची पाहणी केली.​ ​यावेळी टेंभी मत्सव्यावसायिक सहकारी संस्था यांनी निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या. या गावातील तीन बोटींचे नुकसान झाले असून अनेकांची जाळी व अन्य साहित्याची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती मच्छीमार बांधवांनी केली. बोटीच बुडाल्याने बोटीचे मालक, त्यावर काम करणारे खलाशी यांच्या उदरनिर्वाहाची साधनेच उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे तातडीने मदत मिळावी अशी विनंती केली.

यावेळी मच्छीमारांनी सांगितले की, आज पर्यंत जेव्हा जेव्हा असे नैसर्गिक आपत्तीने नुकसान होते तेव्हा मच्छीमारांना शासनाकडून मदत मिळत नाही. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांमध्ये राज्यातील मच्छीमारांना बसवून मदत मिळवून देण्यास राज्य शासन पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे आम्हाला केंद्रीय योजनेतून मदत करा अशी विनंती स्थानिक मच्छीमारांच्या प्रतिनिधींनी केली.

अर्नाळ्याच्या मच्छीमार, बागायतदारांची भेट​ :

या दौऱ्यात आमदार अँड आशिष शेलार यांनी  वसईतील अर्नाळा गावात घरांचे आणि केळी व फुलबागांचे नुकसान झाले त्यांची भेट घेतली. तसेच अर्नाळा बंदरातील 4 बोटी बुडाल्या असून त्या मच्छीमारांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला.​
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: