क्रीडा-अर्थमत

‘इंडियाबुल्स’द्वारे कोविडबळी कुटूंबियांना मदत 

मुंबई :
या महामारीच्या काळात इंडिबुल्स (indiabulls) हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना मदत करीत आहे. कोविड काळात अनेक कुटुंबांनी आपल्‍या प्रियजनांना गमावले आहे, खासकरून जेव्हा कुटुंबातील कमविता सदस्‍य गमावला असेल, तेव्‍हा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स यांनी या संकटात पुढाकार घेतला आहे.  कंपनीच्या ज्‍या कर्मचार्‍यानी कोविडमुळे जीव गमावला आहे, त्‍यांच्‍या कुटुंबांना कंपनी 2 वर्षाचे वेतन देणार आहे व भारतात मुलांच्या शिक्षणाचा पदवीपर्यंतचा खर्च करणार आहे.

इंडियाबुल्स (indiabulls) हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे व्‍हाईस चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्‍टर गगन बंगा यांनी कंपनीच्‍या कर्मचार्‍यांना पाठविलेल्‍या मेलमध्‍ये लिहिले आहे की,“मी आपणा सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो की, इंडियाबुल्स हाऊसिंग तुमच्‍या व तुमच्‍या  कुटुंबाच्या पाठीशी उभी आहे. कंपनीच्‍या कोणत्याही कर्मचार्‍याचा कोविडमुळे निधन झाल्याच्या दुर्दैवी घटनेत आम्ही आमच्या कर्मचार्‍यांचे मासिक वेतन त्‍याच्‍या कुटुंबाला दोन वर्षांसाठी देत राहू व त्यांच्या मुलांचे पदवीपर्यंतचे भारतातील शिक्षणाचा खर्चाची आम्‍ही काळजी घेवू. आम्‍ही आमच्या प्रिय सहकार्‍यांना परत आणू शकणार नाही, परंतु मला आशा आहे की ही आर्थिक मदत या दुर्दैवी घटनेत जिवन स्थिर करण्यासाठी, पुनर्स्थापित करण्यास आणि सामोरे जाण्यासाठी या कुटुंबाला आधार देईल.”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: