गोवा 

‘गोव्यात येण्यासाठी ‘निगेटिव्ह प्रमाणपत्र’ अनिवार्ह करा’

उच्च न्यायालयाने दिले राज्यसरकारला आदेश

पणजी :
वाढत्या कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला हायकोर्टाने (high court) सक्तीचे निर्देश दिलेत. येत्या शनिवार, दि. 10 मेपासून राज्यात येणार्‍या प्रवासी आणि पर्यटकांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य करा, अशी सूचना कोर्टाने केलीय. कोविडबाधितांवर उपचार करणार्‍या सरकारी इस्पितळांना पोलिस संरक्षण द्या, असेही निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेत. दक्षिण गोवा अ‍ॅडव्होकेट्स असोसिएशन आणि इतरांनी या सदंर्भात कोर्टात याचिका दाखल केली होती. वकील निखिल पै यांनी याचिकादारांतर्फे युक्तिवाद केला. त्यावर उच्च न्यायालयाने पुढील आदेश दिले आहेत.
कोविड रुग्णांवर उपचार करणार्‍या रुग्णालयांना पुरेसे पोलिस संरक्षण पुरविण्यात यावे. आरोग्य कर्मचारी अधिकार्‍यांना सहकार्य करण्याविषयी जागृती करण्यात यावी. कर्मचार्‍यांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होता नये. तशी स्थिती उद्भवल्यास कठोरात कठोर कारवाई करावी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोणतेही रुग्ण प्रवेश धोरण तयार केले गेले असल्यास केंद्र सरकारने त्याबाबत कळवावे. 200 व्हेंटिलेटर खरेदीसंदर्भात तपशील देण्यासाठी राज्य सरकारने मार्च 2020 मध्ये उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार माहिती द्यावी.
उच्च न्यायालयाने 18 ते 45 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेबाबत माहिती देण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. परिस्थिती नियंत्रणात नसल्याचे गृहित धरून लॉकडाऊन जारी करण्यासंदर्भात काही निर्णय घेतला आहे का, याबाबत राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करावे. राज्यातील कोविड चाचणी सुविधांच्या संदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करावे. त्याचबरोबर राज्यात उपलब्ध असलेल्या अत्यावश्यक औषधांसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करावे. कोविड चाचण्यांचे निकाल लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.
गोव्यात येणारे प्रवासी आणि इतरांना 10 मेपासून 72 तासांच्या आत काढलेला कोविड निगेटिव्ह रिपोर्ट सादर करण्याची सक्ती करा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा उपलब्ध आहे की नाही, याबाबत राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती द्यावी, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: