गोवा 

युवा काँग्रेसच्यावतीने राजीव गांधी यांना अभिवादन

पणजी ​:
गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसने शुक्रवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहताना कोविड रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करुन मदत केली.​ ​हा कार्यक्रम आझिलो हॉस्पिटल, गोवा मेडिकल कॉलेज, दक्षिण जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय-फोंडा आणि मडगाव मधील ईएसआय रुग्णालयात झाला.

युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर, जीपीसीसीचे सरचिटणीस जनार्दन भंडारी, सरचिटणीस डिनिज डिसोझा, युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस अर्चित  नाईक, उत्तर जिल्हा अध्यक्ष विवेक डीसिल्वा, दक्षिण जिल्हा अध्यक्ष उबेद खान, सरचिटणीस दीपक पै, सरचिटणीस मनोज नाईक, सरचिटणीस नेरिसा फर्नांडिस , साईश आरोसकर, क्लीबन फर्नांडिस, संकेत भंडारी, साई देसाई, रियाज सय्यद, हिमांशू तिवरेकर, रोशन चोडणकर, जाकवान मुल्ला आणि इतरांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर म्हणाले की, युवक कॉंग्रेस सदस्यांनी प्रथम राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली, जे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते, आणि नंतर त्यांनी पाणीवाटपासाठी रुग्णालयांना भेटी दिल्या.

youth congress
“आमचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी नेहमीच लोकहितासाठी काम केले. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आम्हीसुद्धा लोकांच्या मदतीसाठी काही प्रयत्न केले. ” असे अ‍ॅड. म्हार्दोळकर म्हणाले.​ ‘राजीव गांधींनी आपल्या महान दूरदृष्टीने भारतात दूरसंचार क्रांती घडवून आणली आणि म्हणूनच आम्ही आपल्या जवळच्या आणि प्रियजनांशी संपर्क साधू शकलो​’ असेही त्यांनी पुढे नमूद केले. ​

दक्षिण गोवा जिल्हा युवक कॉंग्रेस समितीच्या सदस्यांनी दक्षिण गोव्यात पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले तर उत्तर गोवा जिल्हा युवक कॉंग्रेसने ते उत्तर गोव्यात वितरीत केले.​ कोविड -१९ च्या दुसर्‍या लाटेने गोव्याला लक्ष  केल्यापासून युवक कॉंग्रेसचे सदस्य शासकीय रूग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाना आणि लोकांना सतत मदत करत आहेत. त्यांनी सरकारी व खासगी रुग्णालयांमधील प्रत्येक गरजू रूग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: