गोवा महाराष्ट्र

‘गोव्यातच तुटवडा असताना सिंधुदुर्गला ऑक्सिजन कसा देणार?’

मडगाव :
गोव्यातील भाजप सरकारला गोमंतकीयांचे काही सोयरसुतक नाही हे परत एकदा समोर आले आहे. कारण राज्यातच ऑक्सिजनचा (oxygen) तुटवडा असताना महाराष्ट्राला ऑक्सिजन (oxygen) पुरविण्याचे डॉ.  प्रमोद सावंत यांनी दिलेले आश्वासन आमचा दावा खरा ठरविते अशी टिपण्णी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे. सिंधुदुर्गचे आमदार दीपक  केसरकर यांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्गला गोव्यातून प्राणवायू देण्याचे आश्वासन दिल्याचे वक्तव्य केले, त्यावर दिगंबर कामत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आज रुग्णांना प्राणवायुच्या कमतरतेमुळे त्रास सहन करावा लागत आहे. गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळातील डॉक्टर ऑक्सिजनच्या एका सिलींडरवर तीन रुग्णांना प्राणवायु देत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन सिलींडरसाठी धावाधाव करावी लागत आहे. युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते दिवस-रात्र मेहनत करुन लोकांना ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करीत आहेत. गोव्यात रुग्णांचे ऑक्सिजन अभावी हाल होत असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ते सिंधुदुर्गला कसा व कुठून ऑक्सिजन पुरवठा करणार ते स्पष्ट करावे अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे.
goa lockdownमी काल सर्वपक्षिय शिष्टमंडळाकडून गोव्यातील ऑक्सिजन पुरवठा पाहणी करण्याची सरकारकडे मागणी केली होती. परंतु, मुख्यमंत्री वा आरोग्यमंत्र्यांनी त्यावर अजुनही उत्तर दिलेले नाही. प्रधानमंत्री कार्यालयाने मागितलेला ऑक्सिजन ऑडीट रिपोर्ट सरकारने जाहिर करावा. सरकार ऑक्सिजन व्यवस्थापनावर श्वेतपत्रीका काढण्यास का घाबरते हे सरकारने सांगावे अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे. जर सरकारने आताच पाऊले उचलली नाही तर ऑक्सिजनच्या अभावामुळे गोव्यात मृत्यु होतील व त्याची संपुर्ण जबाबदारी भाजप सरकारवर राहिल असा इशारा दिगंबर कामत यांनी दिला आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: