सिनेनामा

हुमा झाली मुख्यमंत्री ‘महाराणी’

मुंबई :
बहुप्रतिक्षित सिरीज ‘महारानी’ (maharani) सादर करण्‍यास सज्‍ज आहे. पण सिरीज सादर करण्‍यापूर्वी निर्मात्‍यांनी हुमा कुरेशीने धारण केलेल्या आणखी एका लक्षवेधक व आकर्षक लुकची झलक दाखवली आहे. इंटरनेटवर धुमाकूळ निर्माण केलेल्‍या ट्रेलरमध्‍ये हुमाचा मुख्‍यमंत्री लुक दिसत आहे, जो उत्तमरित्‍या डिझाइन करण्‍यात आला आहे.

सीएमच्‍या लुकसाठी अभिनेत्रीने गडद रंगाच्‍या साडीसोबत शाल घेतली आहे. हा लुक तिच्‍या भूमिकेसाठी आवश्‍यक असलेल्‍या व्‍यक्तिमत्त्वाला सादर करतो. डोळ्यांमध्‍ये काजळ आणि कपाळावर लाल बिंदी असलेल्‍या लुकमध्‍ये हुमा दाखवून देते की ती येथे टिकून राहणार आहे आणि लुक तिच्‍या भूमिकेला साजेसा आहे.

मुख्‍यमंत्री लुकबाबत सांगताना हुमा कुरेशी म्‍हणाली, ”मी शो लवकरच सुरू होण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. ट्रेलरला खूपच उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि मला खात्री आहे की या शोच्‍या माध्‍मयातून प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन होईल. रानी भारतीची भूमिका बहुआयामी आहे. या भूमिकेमध्‍ये विविध छटा सामावलेल्‍या आहेत. म्‍हणूनच ही भूमिका साकारताना खूपच सन्‍माननीय वाटत आहे. भूमिकेमध्‍ये सामावून जाण्‍यासाठी आम्‍ही विविध लुक्‍सचा प्रयत्‍न केला, ज्‍यामुळे तिच्‍या जीवनातील टप्‍प्‍यांना सादर करण्‍यामध्‍ये मदत झाली.”

निरक्षर असूनही प्रत्‍येक गोष्‍टीचे बारकाईने निरीक्षण करण्‍यापर्यंत बुद्धीकौशल्‍य असलेली, तसेच प्रामाणिक असण्‍यासोबत कुटुंबावर घोंघावणा-या धोक्‍याबाबत लढाऊ वृत्ती असलेली रानी भारती लक्षवेधक विरोधाभास असलेली महिला आहे. तिच्‍या पतीने घेतलेल्‍या निर्णयानंतर तिच्‍या जीवनात अडथळे निर्माण होतात. गायींचे दूध काढणे, शेण थापणे ते सर्व विषमतांवर मात कुटुंबाचे संरक्षण करणे अशा अनेक गोष्‍टी तिला कराव्‍या लागतात. भविष्‍यात तिच्‍याबाबतीत काय घडणार आहे, हे एक रहस्‍य आहे, ज्‍याचा उलगडा लवकरच होईल.

रानी या स्थितीवर मात करू शकेल का? करन शर्मा यांचे दिग्‍दर्शन आणि सुभाष कपूर यांची निर्मिती असलेल्‍या या शोमध्‍ये सोहम शाह, अमित सियाल व विनीत कुमार प्रमुख भूमिकेत आहेत. नरेन कुमार व डिम्‍पल खारबंदा यांची निर्मिती असलेली ‘महारानी’ (maharani) ही काल्‍पनिक सिरीज आहे, जी २८ मे रोजी फक्‍त सोनी लिव्‍हवर प्रदर्शित होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: