गोवा 

‘मी बाबू आजगावकर यांचा समर्थक नाही’

'मिशन फॉर लोकल'च्या राजन कोरगावकर यांचे स्पष्टीकरण

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
आम्ही पेडणेकर स्वाभिमानी आहोत , कुणाच्या मायाजळात फसणारे नाहीत , कुणी कुणाला मदत केली म्हणजे तो त्याच्या आयुष्यभर ऋणात मदतीचे ओझे घेवून राहू शकत नाही , आणि जो कुणी मदत करतो त्याकडे स्वार्थ नसतो तर सामाजिक बांधिलकी असते . मी सध्यातरी कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा आमदार मंत्र्यांचा समर्थक नाही. किंवा आपल्याला उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर पेडणे मतदारसंघात मतांची विभागणी करण्यासाठी पाठवले नसल्याचे स्पष्टीकरण कोरगाव येथील मिशन फॉर लोकल चे राजन कोरगावकर यांनी केले आहे .

सध्या पेडणे या राखीव मतदारसंघातून आपले राजकीय भवितव्य घडवण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. ज्यांच्याकडे लोकविश्वास आणि अधिक मताचे बळ असेल तोच विजयी होणार . निवडणुकीसाठी अजून वर्ष आहे . पेडणे मतदार संघाचा विचार केला तर सध्या विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे . काहीजण राजकारणाचा रंग देवून सामाजिक कार्य करत असताना सरकारवर आमदार मंत्र्यावर टीका टिप्पणी करून जनतेचे मनोरंजन करत असतात . मात्र स्वाभिमानी पेडणेकरांना काय हवे काय नको याचा कधी विचार करत नाही , भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवले जात नाही . जो कोणी निस्वार्थी भावनेने काम करतो त्यांच्यावर टीका करणे त्या व्यक्तीला अमुक अमुक राजकीय पक्षाच्या नेत्याने आमदाराने मंत्र्याने पाठवले आहे अशी चुकीची माहिती पुरवणे आणि पेडणेकरांच्या प्रशावर आवाज न करता दुसरीकडे लक्ष पुरवणे असे वातावरण सध्या निर्माण केले जात आहे .

याच पाश्वभूमीवर कोरगावचे भूमिपुत्र राजन कोरगावकर हे मिशन फॉर लोकल अंतर्गत मतदार संघात कोरोनाच्या महामारीच्या काळात काम करत आहेत ,निस्वार्थी भावनेने मतदार संघात अखंडितपणे काम करताना दिसतात , राजन कोरगावकर यांच्या कार्याची राजकीय पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक नेत्यांनी व सध्या जे आपणच सामाजिक कार्यकर्त्ये व आपणच आता पुढील आमदार आहोत या तोऱ्यात ही नेतेमंडळी आणि त्यांचे समर्थक राजन कोरगावकर याना मडगाव येथून पेडणे मतदार संघात उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पाठवले आहे , राजन कोरगावकर हे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचेच समर्थक आहेत असा अपप्रचार काही विरोधक करत असतात . त्याच पाश्वभूमीवर राजन कोरगावकर यांनी स्पस्ठीकरण देताना आपण उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा समर्थक नाही , किंवा त्यांनी आपल्याला पाठवले नाही , आपण स्वतंत्र आहोत , भूमिपुत्रासाठी काहीतरी करावे या सामाजिक बांधिलकीतून आपण कार्य करत आहे. लोकशाहीच्या मार्गातून कुणीही राजकारणात येवू शकतो . आपण स्वाभिमानी पेडणेकर आहे , या मातीतला जन्मलेला आहे , कामा नोकरीच्या निमित्ताने मडगावला राहत होतो , त्याचा अर्थ मी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचा समर्थक होवू शकत नाही .

पेडणे मतदारसंघासाठी आणि तालुक्याची आपल्या हातून सेवा व्हावी या मुळ उद्देशाने आपण सामाजिक बांधिलकी ठेवून काम करत असल्याची माहिती राजन कोरगावकर यांनी दिली , आमचे स्वाभिमानी पेडणेकर कुणाच्याही मायाजाळात अडकणारे नाहीत , ते निट माणसे ओळखतात आणि मतदान करतात , येणाऱ्या निवडणुकीत पेडणे मतदार संघातून नक्कीच स्वाभिमानी पेडणेकर पर्रीवर्तन घडवून आणताना भुमिपुत्राना न्याय देतील , या मातीतला , या भूमीत जन्मलेला नागरिकच स्थानिकांच्या समस्या समजू शकतो , तो स्थानिकाना चोवीस तास उपलब्ध होवू शकतो असे कोरगावकर म्हणाले .

सध्या कोरोनाचा काळ हा एकमेकाना मदत करण्याचा काळ आहे . मदत करणे म्हणजे त्यातून राजकारण करण्याची हि वेळ नाही ,राजकारणाची ज्या दिवशी वेळ येईल त्यादिवशी राजकारण करुया असे आवाहन राजन कोरगावकर यांनी केले .

मिशन फॉर लोकल तर्फे राजन कोरगावकर  यांनी पेडणे मतदार संघातून जोरदार सामाजिक कार्य कोरोना काळात चालू ठेवले आहे , त्यात कडधान्य वितरण , मास्क , पाणी पुरवठा , वेगवेगळे महिलांसाठी प्रशिक्षण ,घर, मंदिर, सरकारी कार्यालये निर्जंतुनिकरण फवारणी , शैक्षणिक , आरोग्य विषयी मदतीचे काम जोरात सुरु झाल्याने त्याच्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत आहे . म्हणून त्यांच्याविषयी अपप्रचार सुरु केला असे मत त्यांचे समर्थक राजू नर्से यांनी व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: