गोवा सिनेनामा

‘गोमंतकीय चित्रपटांसाठीचा गोवा प्रिमीयर विभाग इफ्फीचा अधिकृत विभाग करा’


मडगाव :

कॉंग्रेस पक्षाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर गोवा मनोरंजन संस्थेने सदर विभागासाठी किमान चार प्रवेशीका गरजेच्या असल्याची अट काढुन टाकली आहे. परंतु हे पुरेसे नसुन, आगामी इफ्फी-२०२१ मध्ये गोमंतकीय कोंकणी व मराठी चित्रपटांसाठीच्या गोवा प्रिमीयर विभागाचा अधिकृत विभागात समावेश होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरीत हस्तक्षेप करुन गोमंतकीय निर्मात्यांना न्याय द्यावा अशी आग्रही मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.भाजप सरकार गोमंतकीय कलाकार व सिने कलाकारांचा मान राखण्यास अपयशी ठरले आहे. कोविड महामारीच्या संकट काळात गोव्यातील चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटांची निर्मिती केली हे अभिमानास्पद आहे. सरकारने त्यांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अधिकृत विभागात प्रदर्शीत करणे हा सदर कलाकारांचा सन्मान ठरेल असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.


गोवा मनोरंजन संस्थेच्या अधिकृत संकेत स्थळावर असलेल्या इफ्फी-२०२१ साठी गोमंतकीय चित्रपटांच्या निवडीसाठी जारी केलेल्या नियमावलीत कलम ९ नुसार, प्रदर्शीत होणाऱ्या चित्रपटाच्या निर्मात्यास गोवा फिल्म फायनांस योजनेखाली लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावरुन गोवा मनोरंजन संस्थेने घोषीत केलेला गोवा प्रिमीयर विभाग हा इफ्फी-२०२१ चा अधिकृत विभाग नसल्याचे उघड होत आहे असे नमुद करुन, दिगंबर कामत यांनी सदर कलम त्वरीत रद्द करण्याची मागणी केली आहे.


सदर कलम ९ नुसार, गोवा प्रिमीयर विभागात प्रदर्शीत होणारे चित्रपट हे अनअधिकृत असतील हे स्पष्ट आहे. सदर चित्रपटांच्या निर्मात्यांना गोवा चित्रपट अनुदान योजने अंतर्गत कोणताही लाभ मिळणार नाही तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांचा चित्रपट प्रदर्शीत झाला होता असा दावा सुद्धा निर्मात्यांना करता येणार नाही असे दिगंबर कामत यांनी सांगीतले.

गोवा फिल्म फायनांस योजनेखाली कलम ८ च्या नियम क प्रमाणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत प्रदर्शीत झालेल्या फिचर फिल्मला ५ लाख व नॉन फिचर फिल्मला २.५ लाख अर्थ सहाय्य मिळते.


भाजप सरकारने गोवा चित्रपट अनुदान योजना बासनात गुंडाळून ठेवली असुन, मागील ५ वर्षे गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांना सरकारकडुन ठोस मदत मिळालेली नाही. माझ्या सरकारच्या काळात २००७ ते २०११ पर्यंत गोमंतकीय निर्मात्यांचे अनेक चित्रपट इफ्फीच्या अधिकृत विभागात प्रदर्शीत करण्यात आले होते तसेच आंतरराष्ट्रीय स्थरावर पुरस्कार प्राप्त केलेल्या गोमंतकीय युवा निर्मात्यांचा आम्ही योग्य सन्मान केला होता याची आठवण दिगंबर कामत यांनी करुन दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: