देश-विदेशसिनेनामा

मराठी, बंगाली, कन्नड सिनेमांचे ‘इंडियन पॅनोरमा’वर वर्चस्व

दिमसा भाषेतील ‘शेमखोर’ने उघडणार विभागाचा पडदा

नवी दिल्ली :
52 व्या इफ्फीतील भारतीय सिनेमांच्या ‘इंडियन पॅनोरमा’ विभागाची आज घोषणा करण्यात आली. गेल्या काही वर्षांप्रमाणे याही वर्षी या विभागावर मराठी सिनेमांचे वर्चस्व अबाधित राहिले असून, या वर्षी तब्बल पाच मराठी सिनेमे आणि एक लघुपट या विभागात असणार आहे. त्याचप्रमाणे बंगालीतील पाच आणि चार कन्नड सिनेमे निवडण्यात आले आहेत.

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याच्या प्रसिध्दीपत्रकानुसार या वर्षी ‘इंडियन पॅनोरमा’तील 221 पूर्ण लांबीचे सिनेमे आले होते. एस.व्ही. राजेंद्रसिंग बाबू यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने यातील 25 सिनेमांची निवड केली.

समितीने निवडलेले सिनेमे पुढीलप्रमाणे :
बंगाली : कालकोखो (दिग्द. राजदीप पॉल, शर्मिष्ठा मैती), नितांतोई सहज सरल (सत्रबित पॉल), अभिजन (परंबत्रा चटोपाध्याय), मनिकबाबर मेघ (अभिनंदन बॅनर्जी), डिक्शनरी (बर्त्या बसू)
बोडो : सिजाऊ (विशाल चलिहा)
दिमसा : शेमखोर (अमी बरुहा)
गुजराती : ट्वेन्टी फर्स्ट टिफिन (विजयगिरी बावा)
हिंदी : एट डाऊन तुफान मेल (अक्रिती सिंग), अल्फा बिटा गामा (शंकर श्रीकुमार)
कन्नड : डोलू (सागर पुराणिक), तलेदंड (प्रविण कृपाकर), अ‍ॅक्ट 1978 (मंजुनाथ एस.) निली हक्की (गणेश हेगडे)
मल्याळम : निरये तत्ताकलुला मरम (जयराज), सनी (रंजीत सरकार)
मराठी : मी वसंतराव (निपुण धर्माधिकारी), बीटरस्वीट (अनंत महादेवन), गोदावरी (निखिल महाजन), फ्युनरल (विवेक दुबे), निवास (मेहुल अगजा)
मिशिंग : बोम्बा राईड (बिश्वजीत बोरा)
संस्कृत : भगवदज्जुकम (यदु विजयकृष्ण)
तमिळ : कुळंगल (विनोदराज पी. एस.)
तेलुगू : नाट्यम (रेवनाथ कोरुकोंडा)

लघुपटांमध्ये हिंदीचे वर्चस्व :
प्रसिध्द माहितीपट निर्माते एस. नल्लामुत्थू यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने प्राप्त झालेल्या 203 लघुपटांमधून 20 लघुपटांची अंतिम निवड केली आहे. यातील ‘वेद… द व्हिजनरी’ या इंग्रजी माहितीपटाने विभागाची सुरुवात करण्यात येणार आहे.

आसामी : विरांगणा (किशोर कालिता)
बंगाली : नाद – द साउंड (अभिजीत पॉल), साइनबरी टू संदेशखाली (संघमित्रा चौधरी)
इंग्लीश : बादल सरकार अँड द अल्ट्रनेट्रिव्ह थिएटर (अशोक विश्वनाथन), वेद… द व्हिजनरी (राजीव प्रकाश), सरमॉउटिंग चॅलेंजस (सतिश पांडे)
गरवाडी : सुनपत (राहुल रावत)
गुजराती : द स्पेल ऑफ पर्पल (प्राची बजनिया)
हिंदी : भारत, प्रकृती का बालक (डॉ. दिपीका कोठारी, रामजी ओम), तीन अध्याय (सुभाष साहो), बबलू बॅबिलोन से (अभिजीत सारथी),
द नॉकर (अनंत महादेवन), गंगा-पुत्र (जयप्रकाश), गजरा (विनित शर्मा), जुगलबंदी (चेतन भाकुनी)
मणिपुरी : पबुंग शाम (होबाम पबन कुमार)
मराठी : ममर्स ऑफ द जंगल (सोहिल वैद्य)
उडिया : बॅकस्टेज (लिपिका सिंग दाराई)
संथाली : विच (जॅकी बाला)
तमिळ : स्विट बिर्याणी (जयचंद्र हश्मी)

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: