क्रीडा-अर्थमत

‘आयआयएफएल होम फायनान्स’ने केली सेंट्रल बँके सोबत हातमिळवणी

मुंबई :
आयआयएफएल होम फायनान्सने सेंट्रल बँके सोबत सामंजस्य करार केल्‍याची घोषणा केली आहे.  भारतातील सर्वात मोठया व्‍यवसायिक बँकांपैकी एक असलेली सेंट्रल बँक ऑफ इंडिया हि अल्‍प उत्‍पन्‍न गट आणि मध्‍यम उत्‍पन्‍न गट क्षेत्रामध्‍ये गृह कर्जासाठी अग्रगण्‍य संस्‍था आहे.

आयआयएफएल एचएफची अपेक्षा आहे की येत्या काळात कर्ज वितरणामध्‍ये 18% वाढ होईल. लोन सोर्सिंग व सर्व्हिसिंगचे व्यवस्थापन आयआयएफएल होम फायनान्सद्वारे केले जाईल आणि 80% कर्ज सेंट्रल बँक देईल. आयआयएफएल होम फायनान्स ग्राहकांना सोर्सिंग, कागदपत्र पूर्तता, संग्रहण आणि ईतर सेवा देईल. हया करारा मुळे आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेडला भारतातील मोठ्या ग्राहकांना गृह कर्जे देण्याच्या कार्यात बळकट मिळेल.

या व्‍यवस्‍थेमुळे आयआयएफएल होम फायनान्सला आपल्या ग्राहकांना अधिक आकर्षक व्याज दर देण्यास मदत होईल. या पुढाकाराने आयआयएफएल एचएफला तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आपले स्‍थान भक्‍कम होण्याची अपेक्षा आहे. आयआयएफएल एचएफएलने नुकतीच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 43000 लाभार्थ्यांना सीएलएसएस अनुदान लाभ वितरित करण्यास सोय केली आहे. आयआयएफएल एचएफने 17 राज्यांत अनुदानाचा लाभ मिळवून दिला असून, हि रक्‍कम एकूण 102 कोटी रुपये आहेत. कंपनीने आतापर्यंत 1,25,000 हून अधिक कुटुंबांना कर्ज वितरित करून सुखी केले आहे.

या विषयी बोलताना होम फायनान्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्‍यवस्‍थापकिय संचालक मोनू रत्रा म्हणाले, “आम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडियाबरोबर भागीदारी करण्यास उत्सुक आहोत, या सहकार्य करारा मुळे किफायतशिर गृहनिर्माण क्षेत्रामध्ये आपले लक्ष्य वाढविण्याच्या आमच्या धोरणास आणि उद्दीष्टास दृढ करेल. नविन ग्राहक पर्यन्‍त पोहण्‍यामुळे आणि सह-कर्ज देण्याच्या यंत्रणा तयार झाली असल्‍यामुळे आमच्‍या प्रगतीचा आलेख नक्‍कीच उंचावेल. आम्‍ही लक्षात घेत आहोत की कोविड संकटा मुळे ग्राहकांच्‍या खरेदी क्षमतेवर परिणाम झाला आहे,  या सह-कर्ज ऊभारणी च्या माध्यमातून आम्ही नवोदित गृह खरेदीदारांना स्पर्धात्मक किंमतीवर अधिक परवडणारी गृह कर्ज देऊ शकू आणि त्याद्वारे बाजाराच्या पुनरुज्जीवनात मदत होईल.”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: