क्रीडा-अर्थमत

२३ रोजी येणार इंडिया पेस्टिसाइड्सचा आयपीओ

लखनौ:
इंडिया पेस्टिसाइड्स लिमिटेडने बुधवार 23 जून 2021 रोजी त्यांच्या इक्विटी शेअर्सचे पब्लिक ऑफरिंग करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ही ऑफर 25 जून 2021 रोजी बंद होणार आहे. या ऑफरसाठी रु.290 – रु.296 हा प्राइस बँड निर्धारीत करण्यात आला आहे. कंपनी आणि प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डरने, बीआरएलएमशी सल्लामसलत करून अँकर इन्व्हेस्टर्सचा सहभाग मान्य केला आहे, ज्याचा सहभाग बोली / ऑफर उघडण्याच्या तारखेच्या एक दिवस आधी म्हणजे मंगळवार, दि. 22 जून 2021 रोजी काम करेल. बोली लावणाऱ्या सर्वांनी राखून ठेवलेल्या रकमेचे सहाय्य असलेले (ASBA) अॅप्लिकेशन वापरणे अनिवार्य आहे.

एकूण ऑफरचे मूल्य रु.800 कोटीपर्यंत आहे, ज्यात इक्विटी शेअर्सच्या ताज्या इश्युचे मूल्य रु. 100 कोटीपर्यंत आहे आणि इक्विटी शेअरची विक्रीची ऑफर रु. 700 कोटीपर्यंत आहे जी विक्री करणाऱ्या शेअरहोल्डरकडून आहे. ताज्या इश्युमधून संकलित होणाऱ्या निधीचा वापर खेळत्या भांडवलाच्या आवश्यकता आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी करण्यात येणार आहे.

ही कंपनी पाच टेक्निकल्सची एकमेव भारतीय उत्पादक आहे आणि उत्पादन क्षमतेच्या बाबतीत कॅप्टन, फोल्पेट आणि थिओकार्बामेट हर्बिसाइट यांचे जागतिक पातळीवर आघाडीचे उत्पादक आहेत. कंपनी निर्मिती करत असलेल्या काही महत्त्वाच्या फंजिसाइड टेक्निकल्समध्ये पुढील उत्पादनांचा समावेश होतो : (i) फोल्पेट, जे विनयार्ड्स, तृणधान्ये, पिके आणि पेंट्समधील बायोसाइडमध्ये बुरशीजन्य वाढ नियंत्रित करणारी बुरशीनाशके तयार करण्यासाठी वापरले जाते; आणि (ii) सायमॉक्सॅनिल, जे द्राक्षे, बटाटे, भाज्या आणि इतर अनेक पिकांवर होणाऱ्या तंतु भुरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बुरशीनाशकाच्या निर्मितीमध्ये वापरण्यात येते. कंपनीतर्फे निर्मिती करण्यात येणाऱ्या प्रमुख हर्बिसाइड टेक्निकल्समध्ये थिओकार्बामेट हर्बिसाइडचा समावेश आहे. याचा उपयोग गहू आणि तांदळांच्या पिकांच्या बाबतीत करण्यात येतो आणि जागतिक पातळीवर याचा वापर होतो.

आनंद स्वरूप अग्रवाल 
आनंद स्वरूप अग्रवाल

उत्तरप्रदेशमधील लखनौ आणि हरदोई येथील दोन कारखान्यांच्या माध्यमातून सध्या कंपनीचे काम सुरू आहे. या कारखान्यांची टेक्निकल्ससाठीची क्षमता 19,500 मेट्रिक टन आहे आणि फॉर्म्युलेशन व्हर्टिकलची क्षमता 6,500 मेट्रिक टन इतकी आहे. त्यांच्याकडे सध्या 22 कृषि रासायनिक टेक्निकल्ससाठी नोंदणी आणि परवाने आहेत आणि भारतात विक्री करण्यासाठी 125 रससूत्रे (फॉर्म्यूलेशन्स) आहेत आणि निर्यातीसाठी 27 कृषी रासायनिक टेक्निकल्स आणि 35 रससूत्रे (फॉर्म्युलेशन्स) आहेत.

ही ऑफर सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन 31 सह सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन्स) नियम, 1957 नियम 19(2)(b) नुसार देण्यात आली आहे. ही ऑफर सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन 6(1) नुसार करण्यात आली आहे. ही ऑफ बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून करण्यात आली असून यात 50% हून अधिक ऑफर क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल खरेदीदारांना वाटपासाठी उपलब्ध नसेल आणि नॉन इन्स्टिट्युशनल खरेदीदारांना वाटप करण्यासाठी 15% हून कमी ऑफर उपलब्ध नसेल आणि रिटेल वैयक्तिक बिडर्सना वाटप करण्यासाठी 35% हून कमी ऑफर उपलब्ध नसेल.

अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि जेएम फायनान्शिअल लिमिटेड हे या ऑफरचे बीआरएलएम आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: