सिनेनामा

‘इंडियन पॅनोरमा’साठी पाठवा तुमचा सिनेमा

नवी दिल्ली :
52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- ईफ्फीच्या 2021 च्या भारतीय पॅनोरामा विभागासाठी आवेदने पाठवावीत असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय पॅनोरामा हा इफ्फीमधील एक महत्वाचा विभाग असून, त्या अंतर्गत, भारतातील चित्रपट कलेला प्रोत्साहन देण्यासाठी समकालीन सर्वोत्तम भारतीय चित्रपट दाखवले जातात. यंदा, इफ्फीचा 52 वा सोहळा, गोव्यात, 20 ते 28 नोव्हेंबर, 2021 दरम्यान होणार आहे.

या विभागासाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 12 ऑगस्ट 2021 ही आहे, तसेच, ऑनलाईन राजासोबतच त्याची हार्ड कॉपी आणि आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख  23 ऑगस्ट 2021 ही आहे. 2021 च्या भारतीय पॅनोरामा विभागासाठी अर्ज सादर करताना निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे अनिवार्य आहे. या विभागासाठी पाठवलेला  चित्रपट  CBFC समोर सादर करण्याची तारीख किंवा चित्रपट निर्मिती पूर्ण झाल्याची तारीख, महोत्सवाच्या  12 महिने आधीच्या कालावधीतील म्हणजेच, एक ऑगस्ट 2020 ते  31 जुलै, 2021 असावी. ज्या चित्रपटांना या कालावधीत सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेले नसेल, मात्र ते याच काळात निर्माण करण्यात आले असतील,तर असेही चित्रपट महोत्सवासाठी पाठवता येतील. सर्व चित्रपटांना इंग्रजीतून सबटायटल्स असणे अनिवार्य असेल.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरामा विभाग 1978 साली सुरु करण्यात आला. भारतीय चित्रपटांना आणि या चित्रपटातून दाखवल्या जाणाऱ्या भारताच्या समृध्द परंपरेला जगासमोर आणण्याच्या हेतूने हा विभाग सुरु करण्यात होता. भारतीय पॅनोरामा विभागात, त्या वर्षीचे भारतातील सर्वोत्तम चित्रपट निवडले जातात.

52-iffi-logo

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील, चित्रपट महोत्सव संचालानालयाद्वारे आयोजित  केल्या जाणाऱ्या भारतीय पॅनोरामा या विभागाअंतर्गत. फिचर तसेच कथाबाह्य चित्रपटही निवडले जातात. या चित्रपटात संकल्पना असलेले, सौन्दर्य आणि नाट्यमयता, अशा पैलूंचा विचार केला जातो. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या भारतातील आणि परदेशी अशा किफायतशीर व्यासपीठांवर प्रदर्शित करण्यासाठी, द्विपक्षीय सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमाअंतर्गत भारतीय फिल्म वीक्स  आणि सांस्कृतिक आदानप्रदान प्रोटोकॉलमध्ये विशेष भारतीय चित्रपट महोत्सव तसेच विशेष भारतीय पॅनोरामा महोत्सव आयोजित केले जातात.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: