क्रीडा-अर्थमतदेश-विदेश

आता देशातील ‘या’ पाच बड्या कंपन्यांचे खाजगीकरण

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) च्या वार्षिक बैठकीला संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या की, सरकार चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून 1.75 लाख कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य पूर्ण करणार आहे आणि याचसाठी या वर्षी पाच मोठ्या कंपन्याचे खाजगीकरण करून त्या कंपन्या खाजगी हातात दिल्या जाणार आहेत.

एअर इंडिया (Air India), भारत पेट्रोलियम (Bharat Petroliam), बीईएमएल, शिपिंग कॉर्पोरेशन आणि कंटेनर कॉर्पोरेशन. या पाच सरकारी कंपन्यांचे यावर्षी खाजगीकरण करण्यात येणार असून याच वर्षी त्या कंपन्या चालवण्यासाठी हस्तांतरित केल्या जाणार आहेत.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये (एफडीआय) 37 टक्के इतकी वाढ झाली असून त्याच वेळी, परकीय चलन साठा जुलैमध्ये वाढून $ 620 अब्ज झाला आहे. तसेच यावेळी अर्थमंत्री म्हणाल्या की नरेंद्र मोदी सरकार सुधारणांसाठी वचनबद्ध आहे. कोरोना महामारीच्या काळातही सरकारने फक्त सुधारणांवर भर दिला आहे आणि गेल्या वर्षी केंद्राने कृषी कायदे आणि कामगार सुधारणांवर भर दिला. त्यांनी उद्योगांना पुढे येऊन अर्थव्यवस्थेत गुंतवणूक वाढवण्याचे आवाहनही केले आहे .

त्याचबरोबर वाढत्या महागाईवर भाष्य करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था सध्या कोरोनाव्हायरसच्या दोन मोठ्या लाटांच्या प्रभावापासून सावरत आहे. महागाई रोखण्यासाठी सर्व शक्य प्रयत्न केले जातील आणि विकास ही सरकारची प्राथमिकता असणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: