google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवादेश/जग

‘शाश्‍वत भविष्याची सर्वाधिक जबाबदारी मनुष्याला’

Environment: आपण जैवविविधता, जंगल आदींच्या संवर्धनाबाबत बोलतो. आपण पृथ्वीकडून केवळ घेत आलोय आणि मोबदल्यात केवळ तिला कचरा दिलाय. शाश्‍वत भविष्याची सर्वाधिक जबाबदारी मनुष्याला आहे. तसेच सर्व प्राणिमात्रांसाठी देखील गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी केले.

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय पर्यावरण आणि शाश्‍वतता परिषदेच्या समारोप सोहळ्यात यादव बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री नीलेश काब्राल, मुख्य सचिव पुनित कुमार गोयल, सीआयआयचे नितीन प्रसाद, सीमा अरोरा, महेश पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

मंत्री यादव पुढे म्हणाले, भारताने अमृतकालात प्रवेश केल्यानंतरच्या पहिल्या अर्थसंकल्पात हरित क्षेत्रात वाढ (ग्रीन ग्रोथ) करण्यासाठी नॅशनल ग्रीन हायड्रोजन व इतर बाबींसाठी तरतूद करण्यात आली आहे. ग्रीन क्रेडीटला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पूर्वी उद्योगांना पर्यावरण, वन, सीआरझेड, अभयारण्य, आदी विभागांद्वारे वेगवेगळ्या मुंजरी घ्याव्या लागत असत. परंतु पर्यावरण मंत्रालयाद्वारे नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यात या सर्व परवानग्या आता एकाच ठिकाणी प्राप्त होतील. त्यामुळे पर्यावरण आणि विकास हे एकमेकांचे विरोधक नसून ते एकत्रितपणे काम करू शकतात.

देशात ई-कचऱ्याचे प्रमाण अधिक असून तो दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काळात 15 ते 20 टक्के वाढ होणार आहे. ई-कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करून पुनर्वापर कशा पद्धतीने करू शकतो याबाबत सर्वांनी कार्य करणे गरजेचे आहे. एकदा वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

परिषद आवारात पर्यावरणपूरक उपकरणे, कचरा व्यवस्थापन, पूनर्प्रक्रिया करणारी विविध यंत्रे आदी विविध कंपन्यांद्वारे प्रदर्शन भरविण्यात आले होते. पर्यावरणप्रेमी नागरिक, विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही या प्रदर्शनाला हजेरी लावली. त्यांनी यंत्रे तसेच विविध उपकरणांची माहिती मिळविली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!