गोवा 

‘… तर गोव्यातील इंटरनेटचा प्रश्न कायमचा सुटेल’

पणजी:
गोव्यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी भेट दिलेली व प्रत्येक पंचायतीच्या दारात पोचलेली ऑप्टिक फायबर (optic fiber)  केबल प्रणालीवर चालणारी इंट्रानेट सेवा कार्यांवित केल्यास गोव्यातला इंटरनेट सेवेचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आता गोव्यातील मोबाईल टॉवर प्रणालीवर आधारीत इंटरनेट सेवेत कसे अडथळे येतात हे कळुन आले हे एका अर्थी बरे झाले. आज जर माझ्या सरकारच्या कारकिर्दीत सुरू केलेली इंट्रानेट सुविधा भाजप सरकारने पुर्णपणे कार्यांवित केली असती तर आज चक्रीवादळ आल्यानंतरही ती अखंडीतपणे चालु राहिली असती. इंट्रानेट सुविधेत सगळे केबल भूमिगत असल्याने वादळी वारे वा पावसाचा प्रभाव त्यावर पडत नाही, असे दिगंबर कामत यांनी सांगितले.

आज मुख्यमंत्र्यानी इंट्रा सर्कल रोमिंग सुविधा उपलब्ध झाल्याचे सांगितल्या नंतरही  इंटरनेट जोडणी मिळणे कठिणच होते. अनेक भागांत कोठल्यास सेवा पुरवठादाराचे कनेक्शन मिळत नसल्याचे कामत यांनी नमूद केले.

आज भाजप सरकारने दूरदृष्टी राखुन निर्णय घेतला पाहिजे. जर पंचायत पातळीवर पोचलेली इंट्रानेट सुविधा प्रत्येक घरात पोचली तर  ऑनलाईम शिक्षण प्रणालीला मजबुती मिळेल. गोवा एक आदर्श राज्य म्हणुन पुढे येऊ शकेल असेही यावेळी कामत यांनी आवर्जून नमूद केले.

 

ताज्या घडामोडी, बात​म्यांसाठी आम्हाला फॉलो करा, फेसबुक आणि ट्विटरवर 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: