गोवा 

भाजप प्रदेशाध्यक्ष जे पी नड्डा गोव्यात दाखल 

पणजी​ :​

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे जल्लोषात आणि अमाप उत्साहात विमानतळावर स्वागत करण्यात आले. यावेळी विमा​​नतळ परिसरात कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यात महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती.

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी  नड्डा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे, गोवा प्रभारी सी टी रवी, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, शिष्टाचार मंत्री माविंन गुदी न्हो, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, नगरविकास मंत्री मिलिंद नाईक, पक्षाचे उपाध्यक्ष दामू नाईक, माजी खासदार नरेंद्र सावईकर आदी मान्यवर उपस्थित होते.

विमानतळाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी भारत माता की जय अशी घोषणाबाजी केली. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने नड्डा यांचे स्वागत करण्यात आले. स्वागत झाल्यानंतर नड्डा यांचा ताफा पणजीकडे रवाना झाला.

पणजी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी पोहोचताच नड्डा यांचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, पणजीचे आमदार बाबुश मोंसेरात, पणजीचे महापौर रोहित मोंसेरात, ज्येष्ठ नेते संजीव देसाई आदी मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच महिला कार्यकर्त्यांनी त्यांची ओवाळणी केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: