गोवा 

 जे पी नड्डा यांची मंत्री, आमदारांशी चर्चा

पणजी​ :​

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्री, पक्षाचे सर्व मंत्री आणि आमदार यांच्यासोबत बैठक घेतली. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे नड्डा यांनी कौतुक केले. पक्षाचे सर्व मंत्री, पदाधिकारी आणि आमदारांनी कोविड काळात केलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. आणि अभिनंदनही केले.

पक्षांच्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघात केलेली मदत, लसीकरण मोहिमेची जनजागृती, गोरगरिबांना केलेले अर्थसाहाय्य याबद्दलही श्री नड्डा यांनी समाधान व्यक्त केले. कोविड महामारी अजूनही संपलेली नाही. देशात आणि राज्यांत मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या सर्व मंत्री आणि आमदार यांनी सजग राहून आपले समाजकार्य यापुढेही असेच सुरू ठेवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गेले १२-१३ दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावांत आणि घरांत पाणी शिरल्याने मोठे आर्थिक आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या विषयावरही यावेळी चर्चा करण्यात आली. आर्थिक नुकसान झालेल्यांना तसेच समस्याग्रस्त लोकांना मदत करा. तसेच विद्यमान परिस्थितीवर लक्ष ठेवा. आणि गरजूंना आवश्यक टी मदत करा, अशी सूचना ​​नड्डा यांनी यावेळी केली.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: