गोवा देश-विदेश

जे.पी. नड्डा 11 व 12 जुलै रोजी गोव्यात

पणजी :
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा येत्या 11 आणि 12 जुलै रोजी दोन दिवसांच्या गोव्याच्या भेटीवर असतील. 2022 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षाच्या अनेक नेत्यांचा राज्यात दौरा होणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा 11 आणि 12 जुलै रोजी दोन दिवसांच्या गोव्याला असतील. ते 12 जुलै रोजी पत्रकार परिषदेत बोलतील, असे भाजपाने म्हटले आहे.

 

या भेटीत  2022 मध्ये होणार्‍या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवर चर्चा होणार आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, हिमाचल प्रदेश आणि गुजरात या सातपैकी सहा राज्यांमधील निवडणुका जिंकणे भाजपासाठी महत्त्वपूर्ण आहे, या पार्श्वभूमीवर जे पी नड्डा यांची गोवा भेट महत्वपूर्ण ठरणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: