कला-साहित्यमुंबई 

जहांगीरमध्ये ‘दि फॅबुलस ९’

मुंबई :
भारतातील विविध प्रांतातील ९ समकालीन कलाकारांनी एकत्रितपणे मांडलेले त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रांचे व शिल्पांचे कलाप्रदर्शन ११ जानेवारी पासून ऑडीटोरियम हॉल, जहांगीर कलादालन, काळा घोडा, महात्मा गांधी रोड, मुंबई येथे सुरु झाले असून ते तेथे सर्वांना १७ जानेवारी पर्यंत विनामुल्य रोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बघता येईल.

ह्या प्रदर्शनाचे आयोजन ज्ञानेश्वर ढवळे यांनी केले आहे. ज्ञानेश्वर ढवळे स्वतः एक कलाकार असून ह्या प्रदर्शनाद्वारे भारतातील विभिन्न संस्कृती विशेष असणाऱ्या कलावंतांची चित्रे व शिल्पाकृती एकाच छताखाली एकत्रितरित्या मांडून त्या कलाकृतींना योग्य अशा कलासंग्राहकांपर्यंत पोहोचवणे व तशी बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा त्यांचा उद्देश आहे.

ह्या प्रदर्शनात सहभागी होणारे कलाकार अमित भार- कोलकाता, अरविंद महाजन – मध्य प्रदेश, बिप्लव बिजॉय दत्ता- मुंबई, गौतम मुखर्जी- मुंबई, राजेंद्र प्रधान- नागपूर, रवि मिश्रा- जयपूर, समीर सरकार- कोलकाता, सुब्रता दास- कोलकाता आणि सुब्रता पॉल- कोलकाता यांचा समावेश आहे.

अमित भार- निम्न वास्तववादी शैलीतील त्यांची चित्रे बंगालमधील ग्रामीण परिसरातील संस्कृती तेथील राहणीमान व जीवन शैली दर्शवतात. त्यांच्या चित्रांमधील छाया-प्रकाशाचा योग्य संकल्पनेतून साधलेला दृश्यपरिणाम अवर्णनीय होय.

अरविंद महाजन– त्यांची चित्रे भावपूर्ण व सौंदर्य गुणांनी नटलेले असून त्यातून दिसणाऱ्या त्या परिसरातील शाही संस्कृती विशेष परंपरा व ऐतिहासिक पाऊलखुणा फार अप्रतिम आहेत. विविध स्त्री रूपातील लावण्य, रूपसौंदर्य भावनिक संपन्नता आणि त्यातील वैविध्य खरोखर फार मनोवेधक व चित्ताकर्षक आहेत.

बिपलाब बिजॉय दत्ता– यांच्या चित्रांमध्ये मुख्यतः शिव व शक्ती यांच्या अनोख्या पण भावपूर्ण समन्वयातून साकारणारी दैवी संकल्पना व अनुभूती दर्शवली आहे. निम्न वास्तववादी शैलीतील ही चित्रे मानवी मनाला शांती व सुख समाधान देतात.

गौतम मुखर्जी यांची वास्तववादी शैलीतील चित्रे सर्वांना बंगालमधील व काळातील लोकजीवनाचे तसेच सामाजिक घडामोडीचे चित्रमय दर्शन घडवतात.

राजेंद्र प्रधान: यांच्या शिल्पकृती मध्ये त्यांनी दर्शविलेले वेगवेगळे विविध आकार व रूपे यातून साधलेला दृश्य परिणाम मानवी मनास थक्क करणारा आहे. ब्राँझ, पॉलीमार्बल व डायस्टोन त्यांचा कलात्मक वापर करून त्याने तयार केलेली विविध शिल्पे खरोखर सर्वांना अमाप आनंद व दृश्य आनंद देतात.

रवी मिश्रा: संगमरवरी दगडातून निर्मिलेली यांची शिल्प रुपे राधाकृष्ण यांच्या विशुद्ध प्रेमाचे उत्कट दर्शन घडवितात. त्यांच्या कलाकृती फार कलात्मक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत व त्यातून सर्वांना त्यांनी दैवी प्रेमाचे अलौकिक दर्शन घडवले आहे.

समीर सरकार– यांची ऍक्रेलिक रंगसंगती तील विविध चित्रे सर्वांना एक वेगळाच दृश्य आनंद व अनुभूती देतात. डोक्यावर पगडी व पागोटे धारण केलेले मानवी आकार भारतीय रूढी परंपरा आणि संस्कृती त्यांचे यथार्थ दर्शन सर्वांना घडवतात.

सुब्रातो दास– यांच्या चित्रांमध्ये साकारलेली विविधपूर्ण कविकल्पना अवर्णनीय होय. भारतीय पुराण कथा मधील योग्य संदर्भाचा व प्रतीकांचा वापर करून त्यांनी साकारलेले राधा व कृष्ण यांची दैवी प्रेमाची विविध रूपे त्यातील भावुकता, कलात्मकता व सौंदर्याने नटलेली विविधांगी प्रतीके आणि त्यातील संवेदनशीलता खरोखर मानवी मनात थक्क करते.

सुब्रतो पॉल- यांनी ब्राँझ व काष्ठ यांच्या कलात्मक संरचनेतून साकारलेली विविध कलारुपे खरोखर कलात्मक आहेत. मानवी मनातील विविध भावना त्यांच्या विविधांगी कृती व हालचाली इतर सजीवांची असणारे त्याचे स्नेहभाव आणि परस्पर संबंध वगैरे गोष्टी कलाकाराने आपल्या खास शैलीत येथे दर्शविले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: