मुंबई 

 ‘…तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं’

मुंबई (अभयकुमार देशमुख) :
आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच… हे जयंतराव पाटील यांचं वाक्य सर्वश्रुत आहे.  त्यामुळे उत्तरप्रदेश सरकारचं कोरोना काळातील कामाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कौतुकावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी टप्प्यातील ट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये योगी सरकारने अभूतपूर्व काम केलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने चांगलं काम केलं आहे अशी स्तुती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली त्यावर ‘उत्तरप्रदेशची परिस्थिती काय होती याची माहिती जगभरातील वर्तमानपत्रांनी दिली. अशा परिस्थितीत उत्तरप्रदेश सरकारने कोरोनाची परिस्थिती चांगली हाताळली असं म्हटलं जात असेल तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार मी करतोय !’ असं म्हणत जयंतराव पाटील यांनी मोदींना टोला लगावला आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: