गोवा 

‘PWDतील कंत्राटी कामगारांना दिली नोकरीची हमी’

पणजी​ :​

दीड हजार युवक सार्वजनिक बांधकाम खात्यात कंत्राटी पद्धतीने कामाला होते. हे खाते अनेक वर्षे सांभाळणारेही त्यांचा प्रश्न सोडवू शकले नव्हते. माझ्या सरकारने त्यांच्या वेतनाचा केवळ प्रश्नच सोडवला नाही तर त्यांना नोकरीची हमी दिली, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

ते म्हणाले, सरकार सर्वसामान्यांच्या संवेदनांची दखल घेणारे आहे. हा प्रश्न माझ्यासमोर आला तेव्हा तो कसा सोडवता येईल याचा विचार केला. प्रसंगी नियम बदलावे लागले तर ते बदलू पण अनेकवर्षे सरकारसाठी सेवा बजावणाऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देऊ असे ठरवले. चार ते पाच हजार रुपयांच्या तुटपुंज्या वेतनावर ते काम करत होते. १ हजार ४९० जणांना नोकरीची हमी सरकारने आता दिली. असे अनेक निर्णय सांगता येतील ज्यातून समाजातील विविध घटकांचे प्रश्न, जे आजवर सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्षित राहिले होते ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकारने केला आहे. याहीपुढील काळात समोर येणारे प्रश्न सोडवत, जनतेला न्याय देत हे सरकार मार्गक्रमण करणार आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: