गोवा देश-विदेश

तरुण तेजपालची निर्दोष मुक्तता 

पणजी :
एका महिला सहकारीने केलेल्या लैगिंक अत्याचार तक्रारीतून ‘तहलका’ मासिकाचे माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल (tarun tejpal) यांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली.  अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सदर निवाडा दिला.  तेजपाल सध्या जामिनावर मुक्त होते.
‘स्टिंग ऑपरेशन’मुळे प्रसिद्ध झालेल्या ‘तहलका’ मासिकाचे संस्थापक-संपादक तरुण तेजपाल (Tarun Tejpal) विरूध्द त्यांच्याच एका महिला सहकाऱ्याने लैंगिक अत्याचाराबाबत तक्रार दाखल केली होती. गोव्यात एका कार्यक्रमाच्या वेळी ही घटना घडली होती. यावरून त्यांना 30 नोव्हेंबर 2013 रोजी अटक करण्यात आली. ते 1 जुलै 2014 पासून जामिनावर होते. या खटल्याचा अंतिम निवाडा आज झाला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याचे युक्तिवाद पूर्ण झाले ​होते.

त्यानंतर न्यायालयाकडून अंतिम निवाडा देण्याची तारीख  27 एप्रिल रोजी देण्यात आली होती. पण त्यावेळी न्यायालयाने निवाड्याची सुनावणी तहकुब करून 12 मे रोजी सुनावणी निश्चित केली होती. बुधवारी 12 रोजी सुनावणीवेळी न्यायालयाने नवीन तारीख देत 19 मेपर्यंत अंतिम निवाडा तहकूब केला होता. ​त्यानंतर तोकते वादळामुळे प्रभावित झाल्याने वकिलांनी पुढील तारीख मागितली होती. ​दरम्यान, आता आज अंतिम निवाडा​ झाला. ​

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: