सिनेनामा

​कंगना रणौतला झाला करोना

​मुंबई :
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या ​अभिनेत्री कंगना रणौतला ​नुकताच ​करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे ​तिने सांगितले आहे. 
कंगनाने करोना झाल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. स्वत:चा फोटो शेअर करत तिने ‘गेल्या काही दिवसांपासून माझ्या डोळ्यांची जळजळ होत होती आणि मला अशक्तपणा जाणवत होता. मी हिमाचलला जाण्याचा विचार करत होते म्हणून काल करोना चाचणी करुन घेतली. आज सकाळी माझ्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.​ ​
यापूर्वी अभिनेत्री आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, विक्रांत मेसी, कार्तिक आर्यन आणि इतर काही कलाकारांना करोना झाला होता. आता त्यांच्या पाठोपाठ अभिनेत्री कंगना रणौतला देखील करोना झाल्याचे समोर आले आहे.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: