सातारा 

‘कराड विमानतळाला मिळावेत आवश्यक ते परवाने’

कराड (अभयकुमार देशमुख) :

कराड विमानतळ बाबत विनंतीपत्रात काही अटी व शर्ती यामुळे कराड नगरपालिकेने गेल्या तीन महिन्यापासून बांधकाम परवाने रखडून ठेवलेले आहेत. कराड शहरातील या विषयावर गटनेते राजेंद्रसिंह यादव यानी रखडलेले बांधकाम परवाने त्वरीत द्यावे, अशी मागणी केली.


यावेळी पालिकेच्या सर्वच नगरसेवकांनी श्री. यादव यांच्या मागणीला एकमताने पाठिंबा देत रखडलेले बांधकाम परवाने उद्यापासून द्यावेत असा ठराव करत कराडकरांना खुशखबर दिली. त्यानंतर बराचवेळ चर्चा होवून प्रशासनानेही बांधकामे देण्यास काही अडचण नसल्याचे स्पष्ट केले.कराड विमानतळ यामुळे गेले काही दिवस उलटसुलट चर्चा आहेत. याबाबतीत इमारत बांधकाम बाबत अनेक अटी, शर्ती आलेल्या असल्याने पालिकेच्या प्रशासनाने गेले तीन महिने बांधकामास परवानगी दिलेल्या नाहीत. याबाबत जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी अभ्यासपूर्ण सर्व बाबी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या. यावर सभागृहात प्रत्येक गोष्टीविषयी चर्चा करण्यात आली. तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांना सविस्तर विचारण्यात येत असून अडचणी यांची विचारणा करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने जोपर्यंत झोनल मॅप तयार होत नाही तोपर्यंत परवानगी देवू शकतो असे सांगितले. त्यामुळे सर्वच नगरसेवकांनी आता रखडून ठेवलेले बांधकाम परवाने त्वरीत उद्यापासूनच द्यावेत अशी एकमताने मागणी केली.


नगरसेवक राजेंद्रसिंह यादव म्हणाले, ज्या अटी, शर्ती लावण्यात येत आहेत. तसेच बांधकाम परवानगी घेण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे. तर कोण परवानगी देणार तसेच ज्या संकेत स्थळावर परवानगी घ्यायची आहे. तेथे कराड शहराचा नावाचा उल्लेखच नाही. नियम, अटी सांगणारी कंपनी ही शासकीय नाही, त्यामुळे त्यांनी दिलेले नियम लागू करण्याचा अधिकार हा पालिकेचा आहे. तेव्हा पालिकेने खासगी कंपनीमुळे शहरातील नागरिकांचे नुकसान करू नये.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: