सातारा 

‘कराडच्या वाढीव भागाकडे राजकीय आकसापोटी सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष’

कराड (अभयकुमार देशमुख) :

कराडमध्ये समाविष्ट झालेल्या वाढीव भागाकडे सत्ताधाऱ्यांनी राजकीय आकसापोटी दुर्लक्ष केल्याचा आरोप लोकशाही आघाडीचे नेते सुभाष पाटील यांनी कराड नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर केला आहे. लोकशाही आघाडीने घेतलेल्या पत्रकार परिषद प्रसंगी ते बोलत होते.


लोकशाही आघाडीच्या नवीन कार्यकारणी निवडीचा कार्यक्रम आज कराड येथे पार पडला. यावेळी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष म्हणून जयंतकाका पाटील यांची तर उपाध्यक्ष म्हणून विद्याराणी साळुंखे, डॉ. सतिश शिंदे यांची निवड झाल्याची घोषणा सुभाष पाटील यांनी केली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेवेळी कराड नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर सुभाष पाटील यांनी सडकून टिका केली.


वाढीव भागातील रहिवाशी हे पी.डी. पाटील साहेब आणि बाळासाहेब पाटील यांच्यावर विश्वास ठेवणारे आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांना राजकीय आकस ठेवून सुविधा पुरवल्या नाहीत. त्या ठिकाणी असलेले सत्ताधारी नगरसेवक देखील या भागातल्या रहिवाशांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याचे पाटील यांनी सांगितले. सोबत लोकनियुक्त नगराध्यक्षा या भाजपच्या नगराध्यक्षा नाहीत. तर एम. आय. एम पक्षाच्या असुद्दीन औवेसींच्या कृपेने निवडून आलेल्या नगराध्यक्षा आहेत. अशी टीकाही सुभाष पाटील यांनी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यावर केली.


या पत्रकार परिषदेला जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते सौरभ पाटील, माजी नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे नगरसेवक मोहसीन आंबेकरी, नगरसेविका पल्लवी पवार, शिवाजी पवार, माजी नगरसेवक सुहास पवार, पोपट साळुंखे, राजेंद्र पवार, जयंत बेडेकर, महेश कदम, आख्तर आंबेकरी, मुस्सदिक आंबेकरी आणि लोकशाही आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: