सातारा 

‘केवळ पैशासाठीच विरोधकांचे अभद्र मनोमिलन’

कराड (अभयकुमार देशमुख) :

मनोमीलन करणं हे पूर्णपणे चुकीचे होतं, कारण गेल्या सहा वर्षात दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. एकमेकांच्या विचारांचे कोणत्याही प्रकारची सांगड नव्हती. मग यांचे मनोमिलन कसं होणार, आणि जरी हे अभद्र मनोमिलन झालं असतं तरी ते मनोमिलन पैशासाठीच असल्याची टिका सहकार पॅनेलचे प्रमुख सुरेश भोसले यांनी विरोधकांवर केले आहे.

रेठरे येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचार शुभारंभावेळी ते बोलत होते. यावेळी माजी चेअरमन मदनराव मोहिते, डॉ. अतुल भोसले, पै. आनंदराव मोहिते, धनाजी पाटील यांच्यासह उमेदवार आणि सभासद उपस्थित होते.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कारखान्याच्या हितासाठी भविष्यात जे -जे चांगलं करायचा आहे, आणि जे मागील पाच वर्षात चांगले केले तोच अजेंडा घेऊन आम्ही सभासदांना समोरे जात आहोत. सभासदांचे आणि कामगारांचे आम्ही हित जपले आहे. यापुढील काळातही कारखाना अव्वल ठेवला जाणार आहे. त्यामुळे सभासद जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला चांगल्या मतांनी निवडून देतील.

मदनराव मोहिते म्हणाले, निवडणूक होण्याअगोदरच विरोधकांच्या वाटण्या चालू झाल्या आहेत. परंतु ज्यांना मनासारखे मिळाले त्यांनी मनोमिलनाला विरोध केला. सभासदांसाठी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका पाहिजे. दोन विरोधकांच्यात एकाने कारखाना लुबाडला, त्यामुळे आता कारखाना चांगला कसा चालला हे, सभासदांनी पाहिले आहे. मी केवळ सभासद आणि कारखान्याच्या हितासाठी सहकार पॅनेल सोबत आहे.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, विरोधकांच्याकडे कुठलाच मुद्दा नसून केवळ वैयक्तिक टिका टिप्पणी करण्याचे काम चालू आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीत अपप्रचार करत आहेत.

रेठरे गावच्या कोणत्याच लोकांच्या हिताच्या संस्थेच वाटण्या होत नसतात. मग कृष्णा कारखान्यात हे वाटण्या स्वार्थासाठी करण्यासाठी निघाले. तेव्हा या स्वार्थी लोकांना सभासद 29 तारखेला त्यांची जागा दाखवतील.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: