सातारा 

कराडकरांची घरपट्टी माफ करण्यासाठी ‘लोकशाही’चा पुढाकार 

कराड (अभयकुमार देशमुख) :
सातारा नगरपालिकेच्या धर्तीवर व नगरपरिषद अधिनियम 1965 च्या तरतुदींचा आधार घेऊन लॉकडाऊन कालावधीतील वाणिज्य घरपट्टी माफ करणे शक्य आहे. याद्वारे कराडकरांना काही अंशी दिलासा मिळेल यासाठी लोकशाही आघाडीचे नेते जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना निवेदन देण्यात आले. निवेदनासमवेत नगरपरिषद अधिनियम 1965 मधील कायदेशीर तरतुदींची प्रत देखील देण्यात आली.

यावेळी जयंत पाटील, नगरसेवक मोहसीन आंबेकरी, बांधकाम सभापती सुहास पवार, पोपटराव साळुंखे (रा.कॉ. शहर अध्यक्ष), युवानेते शिवाजी पवार, जयंत बेडेकर, गंगाधर जाधव, अमित शिंदे, अनिल धोत्रे, रणजीत पाटील, सचिन चव्हाण, रोहित वाडकर उपस्थित होते.

तसेच कोरोनाचा प्रभाव वाढतो आहे. टीम लोकशाही कराडकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. कराडकरांनी काळजी घ्यावी असे आवाहनही टीम लोकशाही आघाडीच्या वतीने करण्यात आले.
karad
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: