google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

‘कराड उत्तरचे ऋणानुबंध कायम जपणार’

कराड (अभयकुमार देशमुख) :

तुमच्यामुळे लोकसभेत मला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. खासदार, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री व आमदार असताना मतदारसंघाचा गौरव वाढविण्याचा मी सतत प्रयत्न केला आहे. कराड लोकसभा मतदारसंघातील कराड उत्तरचे जुने ऋणानुबंध कधीही विसरणार नाही. हे ऋणानुबंध कायम जपणार आहे. असे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

अंतवडी (ता. कराड) येथे माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांची कराड उत्तर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झालेबद्दल भव्य सत्कार समारंभ व आ. पृथ्वीराज चव्हाण तसेच निवासराव थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या १२ कोटी १४ लाख रुपयांच्या विविध विकासकामाचे भूमिपूजन, उद्धघटन कार्यक्रमात ते बोलत होते. माजी सरपंच मुकुटराव शिंदे अध्यक्षस्थानी होते.

कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, जेष्ठ नेते मारुतीशेठ जाधव, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मोहनराव माने, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश नलवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम दिक्षीत, नंदकुमार जगदाळे, कोयना सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य भिमराव डांगे, दिपक लिमकर, जे. के. पाटील, कराड उत्तर सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष उमेश साळुंखे, यशवंत चव्हाण, शिवाजी विद्यापीठ सिनेटचे सदस्य अमित जाधव, शैलेश चव्हाण, उमेश मोहिते, इंद्रजित जाधव, आनंदराव चव्हाण, विजय कदम, लहुराज यादव, दादासाहेब चव्हाण, सतीश इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराड उत्तरमध्ये साखळी बंधारे उभारण्याचे काम माझ्या हातून मुख्यमंत्री असताना झाल्याचे मोठे समाधान वाटते. अंतवडी येथे पाझर तलावासाठी मी मुख्यमंत्री असताना विशेष निधी मंजूर केला होता. विकासकामात श्रेयवादाची लढाई करणे चुकीचे आहे.

ते म्हणाले, देशात भाजपच्या माध्यमातून द्वेष निर्माण केला जात आहे. बंधुत्व, समता, न्याय, स्वातंत्र्य याला सुरुंग लावायचा. विषमतेच्या वातावरणात देश नेवून पुन्हा वर्णाश्रम पद्धती आणायची चालली आहे. याला आपल्यातील काही माणसे स्वतः च्या स्वार्थासाठी मदत करत आहेत. देशातील अस्थिरतेचे व विषमतेचे वातावरण बदलविण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे.

यावेळी अविनाश नलवडे, भीमराव डांगे, अमित जाधव, उमेश साळुंखे, सतीश इंगवले यांची भाषणे झाली.

शामगावचे नूतन सरपंच विजय पाटोळे व सदस्य, कवठेचे सरपंच लहुराज यादव तसेच योगेश शिंदे यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले याबद्दल आ. चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

माजी सरपंच शिवाजी शिंदे, हणमंत शिंदे, बाबूराव कुंभार, दिलीप कुंभार, प्रवीण शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. विनोद जाधव यांनी प्रास्ताविक केले. विजय माने व दिपक तडाखे यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग झंजे यांनी आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!