सातारा 

कराड शहरातील वाहतुकीत उद्या बदल

कराड (अभयकुमार देशमुख) :

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने उद्या गुरुवारी दि.1 जुलै रोजी कराड शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. कार्वे नाका ते भेदा चौक या मार्गावर दुचाकी, चारचाकी, रिक्षा या लहान वाहन करता हा रस्ता बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजनी पाटील यांनी दिली आहे.कराड येथील राज्य वखार महामंडळाच्या गोडाउनमध्ये कृष्णा कारखान्याची मतमोजणी होणार आहे.

त्यामुळे परिसरातील वाहनधारक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशानुसार व डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील यांच्या सुचनेनुसार वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजनी पाटील

त्यानुसार कार्वे नाका ते भेदा चौक जाणारा रस्ता एसटी व अवजड वाहतुकीसाठी सुरु ठेवण्यात येणार असून दुचाकी, चारचाकी, रिक्षा या लहान वाहन करता हा रस्ता बंद राहणार आहे. या मार्गावरील कार्वे नाका मार्गे कराड शहरात येणारी वाहने मुजावर कॉलनी येथून ईदगाहे मैदान मार्गे कामगार चौकाकडे जातील. तर मतमोजणीच्या अनुषंगाने शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची वाहने जुने तहसील कार्यालय मैदानात पार्किंग करण्यात येणार आहेत. तसेच मतमोजणीच्या अनुषंगाने येणाऱ्या नागरिकांची सर्व प्रकारची वाहने वरद मेडिकल समोरील मैदानात पार्क करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: