गोवा 

कोरगावात २६ रोजी कारगिल विजय दिवस

पेडणे (प्रतिनिधी)
​​आर्वी स्पोर्टस अँड कल्चरल क्लब,कोरगाव या संस्थेच्या वतीने ‘कारगिल विजय दिवसाचे’ दिनांक २६ जुलै २०२१ रोजी सायं.५ वाजता शिवाजी चौक, देऊळवाडा कोरगाव येथे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर, खास निमंत्रित गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष तसेच मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे, हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, कोरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच उमा साळगावकर व इतर मान्यवर उपस्थित असणार आहेत.

या कार्यक्रमात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कोरगाव गावात तसेच पेडणे तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येईल. तसेच कोविड महामारीच्या काळात कोरगाव गावात योगदान दिलेल्या डॉक्टरांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून गौरव करण्यात येईल. यात डॉ. नवनाथ केरकर, डॉ.पंढरी कोरगावकर, डॉ. पुंडलिक गवंडी यांचा गौरव करण्यात येईल. कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने भारतीय नौदलात सेवा बजावलेले अनिल बोंद्रे, वीस वर्षे भारतीय सेनेत सेवा बजावलेले कोरेगावचे सुपुत्र रुपेश भाईडकर यांचा यावेळी खास सत्कार करण्यात येईल.

हा कार्यक्रम कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आर्वी स्पोर्टस अँड कल्चरल क्लबचे अध्यक्ष विराज हरमलकर यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: