google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

कास ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण

सातारा (महेश पवार) :

कास गावावर पुनर्वसनाच्या संदर्भात वारंवार अन्याय होत आहे.त्यामुळे सहनशीलता संपलेल्या कास ग्रामस्थांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे यासंदर्भात कास गावात योग्य पुनर्वसन प्रक्रिया पार पडली नाही तर हे उपोषणाची तीव्रता वाढवणार असून पुढील काळामध्ये प्रसंगी वेगळ्या मार्गाने आंदोलन करू असा इशारा कास ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे

सोमवारी जिल्हा प्रशासनाला कास ग्रामस्थांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात नमूद आहे की गेल्या 162 वर्षांमध्ये कास धरण आणि इतर कामासाठी वेळोवेळी तब्बल 295 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे .नवीन कास धरणाच्या कामांमध्ये पाणीसाठा दगडी चिऱ्याला लागलेला आहे नव्याने बारा फूट पाणी वाढल्यानंतर शिल्लक असणाऱ्या जमिनीमध्ये सुद्धा ही पाणी जाणार आहे त्यामुळे या जमिनीतून आम्हाला जाण्यासाठी पायवाट सुद्धा मिळणार नाही कास ग्रामस्थांची शासनाच्या धोरणामुळे गळचेपी होत आहे

शिल्लक जमिनीमध्ये कास ग्रामस्थांना रिंग रोड करून देण्यात यावा, मुलकी पड गट नंबर 70 मध्ये गावठाणासाठी जागा पुनर्वसन कायदा लागू करणे भूमिपुत्रांना नगरपालिकेत नोकरी, कास गावाला पिण्याच्या पाण्यासाठी लिफ्ट इरिगेशन, ज्या कुटुंबांना पाण्यामुळे रस्ताच करता येत नाही त्या कुटुंबांना पर्यायी रस्त्यालगत मुलकी पड जमिनी  देण्यात याव्यात अशा मागण्या काल ग्रामस्थांनी केल्या आहेत

या मागण्यांची निवेदन खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारा नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट, अधीक्षक अभियंता सातारा पाटबंधारे प्रकल्प महामंडळ पोलीस अधीक्षक समीर शेख जावली तहसीलदार यांना सादर करण्यात आले आहे या मागण्या मान्य न झाल्यास प्रसंगी कठोर आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!