गोवा 

‘जलसिंचन’च्या हलगर्जीपणामुळे फुटला ‘तो’ कालवा

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
कासार्वरणे पेडणे येथील तीलाळीचा जो कालवा फुटला त्याला पूर्णपणे जबाबदार जलसिंचन खाते असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. या कालव्याची दुरुस्ती करावी अशी वारंवार मागणी करूनही त्याकडे लक्ष दिले नाही , त्यांच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले ते पाणी शेतीसाठी दररोज वापरले जात होते. कोसळलेला कालवा जलसिंचन खात्याने माती घालून तात्पुरता दुरुस्त केला आहे , तर सरकारी यंत्रणेने धावपळ करून रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी बरीच धावपळ करून सायंकाळी सहा नंतर रस्ता सुरळीत केला .
तिळारी कालव्यातून हणखणे , चांदेल , हसापुर , कासार्वारणे , नागझर , धारगळ या भागातील विविध शेतीसाठी पाणी सोडले जाते . हा मुख्य शेतीचा कालवा ठिकठिकाणी कमकुवत बनला आहे , त्यातून दिवसा अनेक लिटर पाणी वाया जात आहे , हा कालवा दुरुस्त करावा यासाठी अनेकवेळा शेतकऱ्यांनी मागणी केली होती त्या मागणीकडे जलसिंचन खात्याने दुर्लक्ष केले आहे . त्यामुळे आज एका ठिकाणी कालवा फुटून घटना घडली , भविष्यात जर हा कालवा पूर्णपणे दुरुस्त केला नाही तर अश्या घटनांची पुनरावृत्ती होवू शकते .

कालवा फुटून कासार्वरणे रस्ता तब्बल अर्धादिवस धोकादायक  स्थितीत  बनला , वाहनांना ये जा करण्यासाठी दूरचा रस्ता पकडावा लागला .चिखल झाल्यामुळे अनेक वाहने रस्त्यावर चिखलात रुतून राहिली . शेवटी , जेसीपी घालून चिखल आणि रस्त्यावर वाहून आलेली माती काढावी लागली , रस्ता पूर्णपणे पाणी मारून अग्निशमन दलाच्या जवानाना बरीच मेहनत घ्यावी लागली . एकीकडे लोकाना चंदेल प्रकल्पातून नळांना पाणी मिळत नाही तर दुसऱ्या बाजूने शेतीसाठी मिळणारे पाणी असे वाहुन जात आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: