महाराष्ट्र

म्हाडा’च्या १०० घरांच्या चाव्या ‘टाटा’ रुग्णालयाला सुपूर्द 

मुंबई, अभयकुमार देशमुख :

मुंबईत कॅन्सरवरील उपचारासाठी टाटा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी म्हाडाच्यावतीने १०० घरे देण्यात आली असून, या १०० घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज पार पडला.

महाविकास आघाडी सरकार व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा उपक्रम हाती घेतला असून याचा शुभारंभ आज पार पडला. यावेळी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, टाटा हॉस्पिटलचे डॉ. बडवे, डॉ. श्रीखंडे, गृहनिर्माणचे सचिव श्रीनिवासन, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डिगीकर आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: