क्रीडा-अर्थमत

कोविड मध्येही आंब्याचे बुकिंग तेजीत

मुंबई :
कोविडची दुसरी लाट आणि कडक टाळेबंदीत मुंबई आणि पुण्यात भाज्या तसेच आंब्यांच्या ऑनलाईन खरेदीत वाढ दिसून आली. महाराष्ट्राची वेगाने वाढणारी, थेट शेतातून घरातील टेबलावर भाज्या, फळे आणि मधल्या वेळेतील खाऊ घरपोच पोचवणारी सेवा किसानकनेक्ट’च्या ऑर्डरमध्ये मागील महिन्यांच्या तुलनेत एप्रिल आणि मे महिन्यांत जवळपास 145% ची वृद्धी झाली. याच दोन शहरांत एप्रिल महिन्यापासून टाळेबंदी सुरू झाली. अक्षय्य तृतीया आणि ईद-उल-फित्र’च्या पवित्र आणि उत्सवी पार्श्वभूमीवर ऑर्डरमध्ये आणखी वाढ दिसून आली. किसानकनेक्टवर सर्वाधिक ऑर्डर या आंब्यांच्या आल्या.

मागील महिन्यात एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात कठोर टाळेबंदी घोषित करण्यात आली. किसान कनेक्टच्या वतीने मुंबई आणि पुण्यात साधारणपणे 750 भाज्यांची बास्केट पाठवली जातात. वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांत टाळेबंदी नसताना जितके बिलिंग झाले, त्या तोडीचे बिलिंग एकट्या एप्रिल महिन्यात झाल्याचे किसानकनेक्टचे कृषी तज्ज्ञ विनोद  गुंजाल  सांगतात.

ते पुढे म्हणाले की, निर्बंध लादल्यावर लोकांच्या हालचालींवर नियंत्रण येते. त्यामुळे ऑर्डर वाढतात. लोकांचा किसानकनेक्टसारख्या पर्यायावरून सुरक्षित, आरोग्यदायक, शेतातील ताज्या आणि संपर्क-रहित ऑनलाईन खरेदीकडे कल असतो. ऑर्डरमध्ये वृद्धी होण्यासाठी हेच घटक महत्त्वाचे ठरले. “कोविडच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू संख्येत भरमसाठ वाढ झाली. त्यामुळे लोक स्वत:च्या आरोग्याची फार काळजी घेऊ लागले. त्याशिवाय ऑनलाईन खरेदीत मध्यस्थ नसल्याने भाज्या आणि फळे विकत घेण्यासाठी किसानकनेक्ट सुरक्षित असल्याची लोकांची खात्री झाली. जे ग्राहक भाज्या आणि फळांची खरेदी करण्यासाठी रोज बाजारात जात, त्यांनीही ऑनलाईन खरेदीचा पर्याय निवडला. आमच्या अॅप व खरेदी ऑर्डरकरिता दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर भरपूर ट्रॅफीक वाढल्याचा अनुभव घेतला, असेही गुंजाल यांनी सांगितले.

mangoत्यातच अक्षय्य तृतीया व ईद सारखे सण असल्याने किसानकनेक्टच्या वतीने आयोजित भारताच्या पहिल्याच ऑनलाईन आम महोत्सव (आंबे महोत्सव)त विक्रमी खरेदीची नोंद झाली.” मागील आठवड्यापासून रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्यांना मोठी मागणी होती. आम्ही नियमित सुमारे 150 पेटी आंब्यांच्या पेट्या ग्राहकांकडे पाठवल्या. प्रामुख्याने अक्षय्य तृतीयेला फळांचा राजा असलेल्या आंब्याच्या सेवनाने लोक उन्हाळा साजरा करतात. त्यामुळे बागेतील ताजे आंबे मोठ्या प्रमाणावर आणण्यात आले. यंदा कोविडच्या दुसऱ्या लाटेने ऐन उन्हाळ्यात उचल खाल्याने आंबेप्रेमींनी ऑनलाईन ऑर्डर नोंदवण्यावर भर दिला.” अशी माहिती गुंजाळ यांनी दिली. किसानकनेक्ट’वर आंब्याच्या बाळ हापूस, लालबाग, बदामी, तोतापुरी, लंगडा, केशर, दशहरी, चौसा, नीलम, मल्लिका, जुन्नर हापूस इत्यादी प्रजातींना चांगल्या मागणीची नोंद झाली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: