सातारा 

”किसनवीर’चे शेतकरी मदनदादा भोसलेंसोबत…’

सातारा (महेश पवार):
शेतकरी सभासदांनी पत्रकार परिषद घेत किसनवीर कारखान्यांचे हित बघणार्या मदनदादा भोसले यांच्या पाठीशी ठामपणेअसल्याचे स्पष्ट केले . यावेळी शेतकरी सभासदांनी पत्रकारांशी बोलताना काही प्रश्न उपस्थित केले , दहा वर्षे ज्यांच्या घरात किसनवीर कारखान्यांचे संचालक घरात आहेत , त्यांना शेतकऱ्यांचा कामगारांचा खरंच कळवळा असेल तर त्यांनी स्वतःच्याच घरांवर मोर्चा काढून सभासदांना न्याय मिळवून द्यावा.

तर जे मदनदादा भोसले यांच्या आशीर्वादाने पंचायत समिती सदस्य झाले युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले .हे पण विसरू नये. ज्या मदनदादा भोसले नी विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला त्यांनी आजवर स्वतः ची च राजकीय पोळी भाजून घेतली.जे पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी चे होते व आजही कॉंग्रेस मध्ये राहून राष्ट्रवादी चे हस्तक म्हणून कार्यरत आहेत . यांनी लोकसभेच्या आणी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक कोणाचं काम केले हे जनतेला ठाऊक आहे . आता कारखान्यांची निवडणूक जवळ आल्याने स्वतः ची उमेदवारी निश्चित करण्यासाठीच प्रयत्न सुरू असल्याचे सर्व शेतकरी बांधवांनी स्पष्ट केले.आघाडी सरकारच्या स्थापनेच्या आधी पंचायत समिती च्या गैरव्यवहार प्रकरणी बोलणारे अचानक का शांत झाले .

वाई तालुक्यातील शेतकर्यांच्या प्रश्ना संदर्भात मोर्चा काढणार्या तथाकथित कॉंग्रेसच्या पुढार्यांनी वाई महाबळेश्वर खंडाळा तालुक्यातील भ्रष्टाचारा संदर्भात अनेक प्रकरणं प्रसिध्दीस आणली ती तडीस नेणार का ? जिल्हा कॉंग्रेस कमिटी ने आणि तुम्ही जरंडेश्वर च्या शेतकरी सभासदांबाबत आणि त्यांच्या ठेवी संदर्भात का आवाज उठवला नाही.तालुक्यातील अनेक शेतकर्याकडून नवीन कारखाने सुतगिरणी घ्या शेअर्स च्या नावाखाली जे पैसे गोळा केले त्या संदर्भात का आवाज उठवला गेला नाही .असा सवाल शेतकरी सभासदांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला…

यावेळी अनिल वाघमारे , जयवंत साबळे, ॲड मेघराज भोईटे , अभिजित गायकवाड , संभाजी जाधव पाटील , विश्वास मरगजे , नाना कायंगुडे , राजेंद्र शिर्के, विक्रम शिंदे , रविंद्र ढमाळ , श्रीकांत धाटे, संतोष भोसले , अमर करंजे, जयवंत सुळके , नितीन भोईटे , शिवराज शिर्के , प्रशांत संकपाळ , बापुराव धायगुडे , किशोर बाबर , रोहिदास पिसाळ , प्रकाश शिंदे, संदीप पोळ , राजेंद्र शिर्के , प्रविण पवार , श्रीहरी गोळे , सागर जाधव आदी शेतकरी संभासद उपस्थित होते.

तुम्ही एका पक्षाचे पदाधिकारी आहात तर तुमचे वडील किसनवीर कारखान्याचे संचालक आहेत. तुम्ही एका पक्षाचे काम करता तर वडील दुस-या पक्षातून कार्यरत आहेत. तुमच्या घरात राजकीय साटेलोटे कसे चालते ? याचेही स्पष्टीकरण द्यावे.
-विश्वास मरगजे, उसउत्पादक सभासद, कानवडी ता. खंडाळा

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: