क्रीडा-अर्थमत

कोरोना ​आणि आयुर्वेदातील ज्ञान

– डॉ. जे. हरींद्रन नायर
मी माझ्या कुटुंबातील पहिलाच आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर असल्यामुळे आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांनी जणू एक नवे विश्व माझ्यासमोर खुले केले. सजीवांसाठी त्यांचे खाद्य हेच सर्वोत्तम औषध असते ही जाण त्यातून विकसित झाली. हा विचार आणि आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांमधून मांडलेले निसर्गाविषयीचे ज्ञान आधुनिक शास्त्रोक्त पद्धतींमार्फत प्रत्यक्ष अंमलात आणणे हे माझे जीवन उद्धिष्ट बनले आहे.

कोरोना पासून आणि त्यानंतरच्या प्रभावांपासून देखील शरीराला सुरक्षित राखण्यासाठी आयुर्वेदिक ज्ञानाची कास धरण्याचे प्रमाण वाढले. आणि रोचक बाब म्हणजे माझा प्रवास भारतीय स्वयंपाकघरातील अगदी नेहमीच्या, खूप ओळखीच्या पण अतिशय प्रभावी सामग्रीपासून सुरु झाला.

खूप ठिकाणी म्हटलेच आहे की, भारतीय स्वयंपाकघरापेक्षा जास्त चांगली फार्मसी दुसरी कोणती असू शकत नाही आणि याचे श्रेय जाते भारतीय स्वयंपाकघरात असलेल्या नानाविध नैसर्गिक पदार्थांना.  ते फक्त स्वयंपाकाचे साहित्य नाही तर शरीराच्या वेगवेगळ्या व्याधी दूर करण्याच्या क्षमता त्यामध्ये आहेत. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला त्यापैकी काही विशिष्ट पदार्थांविषयी माहिती देणार आहे, ज्यांचा आयुर्वेदिक औषधे तयार करण्यात खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.

आले :
आल्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे व क्षार असतात.  जीवनसत्त्व क, ब६, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फोलेट, फॉस्फरस, झिंक, रिबोफ्लेवीन आणि नियासिन हे आल्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळून येतात. देशभरात विविध भागांमध्ये स्वयंपाकात सर्रास वापरली जाणारी सुंठ पूड ही त्यामध्ये दाहशामक, जंतुरोधक, विषाणूरोधक गुण असल्यामुळे आयुर्वेदिक औषधांमधील प्रमुख घटक आहे.

काळी मिरी :
प्राचीन चरक संहितेमध्ये काळ्या मिरीचा उल्लेख आहे, सर्दी, खोकला, घशातील सूज, फुफ्फुसाच्या नळ्यांना येणारी सूज, अस्थमा तसेच जठर व आतड्यांचे विकार, रक्ताभिसरणातील त्रास या व्याधींवरील औषधांमध्ये आयुर्वेदिक वैद्य काळ्या मिरीचा उपयोग करत आले आहेत. अँटिऑक्सिडंट व शुद्धीकरण क्षमता काळ्या मिरीमध्ये आहेतच, शिवाय काळी मिरी पोषकद्रव्ये शोषून घेण्याची शरीराची क्षमता वाढवते.

वेलची :
भारत आणि मध्य पूर्वेमध्ये वेलचीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.  लघवीचे प्रमाण वाढवण्याच्या गुणधर्मासाठी ओळखली जाणारी वेलची क जीवनसत्त्व, मँगनीज आणि फायबर यांचा खूप मोठा स्रोत आहे.  अनेक भारतीय मिठाया, चहा, कॉफीमध्ये आवर्जून वापरली जाणारी वेलची आयुर्वेदात उपयोगात आणली जाते ती सर्व दोषांचे (वात, पित्त आणि कफ) संतुलन साधण्याच्या तिच्या गुणधर्मामुळे, त्याचबरोबरीने अति प्रमाणात जमा झालेले श्लेष्मल कमी करून फुफ्फुसातील व पोटातील कफ कमी करण्याची क्षमता देखील वेलचीमध्ये आहे.

दालचिनी :
बहुतेक सर्व भारतीय पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंट, मधुमेहविरोधी, दाहरोधक आणि सुक्षजंतूविरोधी क्षमता असतात.  श्वसनाचे आजार, मधुमेह आणि क्षय या रोगांवरील औषधे तयार करताना आयुर्वेदात दालचिनीचा उपयोग केला जातो.

चिंच :
भरपूर प्रमाणात फायबर, क जीवनसत्त्व आणि पोटॅशियम असलेली चिंच म्हणजे दक्षिण भारतीय स्वयंपाकातील अविभाज्य पदार्थ आहे.  चिंचेच्या झाडावरील फुले, फळे, पाने व खोडासह सर्व भाग आयुर्वेदिक औषधे बनवताना वापरले जातात.  विविध त्वचा विकार, अतिसार, पचनाचे आजार, हृदयविकार आणि इतर अनेक आजारांवरील उपचारांमध्ये चिंचेच्या फळाचा वापर केला जातो.

जिरे :

भारतीय स्वयंपाकात अगदी दररोज वापरला जाणारा, सामान्य पदार्थ म्हणजे जिरे. हे एवढेसे जिरे पण त्यामध्ये जितके लोहाचे प्रमाण आहे तितके लोह असणारे इतर खाद्यपदार्थ फारच कमी आहेत. याशिवाय टर्पेनेस, फिनोल्स, फ्लेव्होनॉइड्स आणि अल्कलॉइड्स यासारखी संयुगे देखील त्यामध्ये आढळतात. सूक्ष्मजीवाणूविरोधी, कर्करोगरोधक आणि मधुमेहविरोधी गुणधर्म असल्यामुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये जिऱ्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो.

खडीसाखर :
गोडवा देणारा नैसर्गिक आयुर्वेदिक घटक म्हणून खडीसाखरेचा उपयोग आपल्या देशात गेली कित्येक शतके केला जात आहे. खडीसाखर शरीराला थंडावा देऊन त्यामध्ये चैतन्य निर्माण करते.  वात, पित्त व कफ या दोषांना शांत करण्याचा गुणधर्म खडीसाखरेमध्ये असल्यामुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा वापर होतो.  कफ पाडणाऱ्या औषधाचे गुणधर्म देखील खडीसाखरेमध्ये असतात.

वरीलपैकी प्रत्येक पदार्थ, इतर काही पदार्थांसोबत वापरल्यास निरोगी शरीरासाठी खूप प्रभावी ठरू शकतो. अस्थम्यावरील उपचारांमध्ये, श्वसनाच्या संसर्गात रोधकक्षमता निर्माण करण्यासाठी आणि सध्याच्या आरोग्यसमस्यांमध्ये शरीराची रोगप्रतिकार क्षमता मजबूत करण्यासाठी मी स्वतः तयार केलेल्या एका पदार्थातील हे सर्व प्रमुख घटक देखील आहेत. औषध प्रणाली म्हणून आयुर्वेदात निसर्ग आणि सर्व सजीवांमध्ये समन्वय व सुसंवाद साधला व राखला जावा हा प्रयत्न असतो. अधिक चांगले आरोग्य मिळवण्यासाठीच्या तुमच्या प्रयत्नांमध्ये प्रत्येक ऋतूमध्ये मिळणाऱ्या, ताज्या व स्थानिक खाद्यपदार्थांचा व मसाल्यांचा वापर आहारामध्ये करण्यावर भर द्या. फक्त चवीसाठी नव्हे तर, ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ या जबाबदारीच्या भावनेने जाणीवपूर्वक उचललेले पुढचे पाऊल म्हणून हा निर्णय अवश्य घ्या.

(​लेखक पंकजाकस्तुरी हर्बल्स इंडिया लिमिटेड​चे संस्थापक​ आहेत.)
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: