कला-साहित्य

कोंकणी परिषदेच्यावतीने 23 रोजी ‘मनस्पूर्वक आर्गा’

konkaniपणजी :
ज्येष्ठ कोंकणी कवी आणि 22 व्या अखिल भारतीय कोंकणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रकाश पाडगांवकर (prakash padgaonkar) यांचे कोरोनाने आणि ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक तथा 25 व्या अखिल भारतीय कोंकणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पावलू मोरास यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी ‘मनस्पूर्वक आर्गा’ या विशेष ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

रविवार, 23 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून होणार्‍या या आदरांजली कार्यक्रमामध्ये डॉ. चंद्रलेखा डिसोजा, एच.एम.पेरनाल, आर.एस. भास्कर, सुमन कुराडे, फिलोनिमा फ्रान्सिस्को हे उभय साहित्यिकांबद्दल आपल्या भावना व्यक्त करणार आहेत.

सदर कार्यक्रमासाठी अधिकाधिक साहित्यप्रेमी आणि भाषाप्रेमींनी ऑनलाईन उपस्थिती नोंदवावी असे आवाहन परिषदेच्या अध्यक्षा उषा राणे, सरचिटणीस सुफला गायतोंडे आणि कार्यक्रमाचे संयोजक गौरीश वेर्णेकर यांनी केले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: