सातारा 

‘मास्क नाही, तर मतदान करता येणार नाही’

​यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक 

​कराड (अभयकुमार देशमुख) :
​​यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुक कार्यक्रमाप्रमाणे मंगळवार दि. 29 जून 2021 रोजी सकाळी 8 ते  5 या वेळेत एकूण 148 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.

मतदानासाठी फक्त मतदारयादी मधील मतदारांनाच  प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांनी मतदानासाठी येताना राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाने विहित केलेल्या पुढील पैकी एक फोटो  ओळखपत्र सोबत ठेवावे. आधार कार्ड,  भारत/राज्य निवडणुक आयोगाचे ओळखपत्र,  पासपोर्ट, वाहन परवाना, पॅन कार्ड, केंद्र/राज्य शासन सार्वजनिक उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या कर्मचारी यांचे फोटो ओळखपत्र , राष्ट्रीयकृत व पोस्ट ऑफिस यांनी दिलेले फोटो असलेले पासबूक,  स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र,  फोटो असलेले जात प्रमाणपत्र, फोटो असलेला अपंग दाखला, फोटो असलेला शस्र परवाना,  राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी यंत्रणा फोटो असलेले जाॅब कार्ड, निवृत्त कर्मचारी फोटो पेन्शन पास बूक, आरोग्य विमा योजना फोटो असलेले स्मार्ट कार्ड​ आदी.  ​तसेच मतदान केंद्रामध्ये भ्रमण ध्वनी/ मोबाईल घेऊन जाणेस मनाई असल्याने मतदारांना मोबाईल घेऊन प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे मतदारांनी मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन येऊ नये​, असे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर यांनी केले आहे. ​

तसेच सर्व मतदारांनी कोविड अनुषंगाने असलेल्या आदेश व निर्देश याचे पालन करणे आवश्यक आहे त्यामुळे मतदान केंद्रावर सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क तोंड व नाक पूर्ण झाकून  परिधान करणे, व सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे. मास्क नसलेस मतदान केंद्रामध्ये प्रवेश मिळणार नाही. तेव्हा याबाबत सर्व मतदार , उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांनी नोंद घ्यावी असे निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कडून अवाहन करणेत आले आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: